![]()
शहराचे सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, तसेच ड्रेनेज लाईनमध्ये गाळ साचून पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राहाता नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे. स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी) २.० अंतर्गत प्
.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, राहाता शहराचे आरोग्य टिकवण्यासाठी सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी साफ असणे गरजेचे आहे. यासाठी ८५ लाख रुपयांचे अत्याधुनिक जर्मन टेक्नॉलॉजीचे वाहन नगरपरिषदेला दिले आहे. या वाहनाची क्षमता ८००० लिटर असून, ते तब्बल १६ टन गाळ उपसा करू शकते. या माध्यमातून भूमिगत गटारांमधील गाळ व कचरा पूर्णपणे साफ होईल आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या सुटेल. शहराच्या स्वच्छतेसाठी निधी आणि यांत्रिक सामग्री कमी पडू देणार नाही. पालिकेने स्वच्छ, सुंदर व हरित राहाता बनवावे.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शाह, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक प्रवीण सदाफळ, अजय आग्रे, राहुल सदाफळ, दशरथ तुपे, संदीप मुर्तडक, अक्षय बोठे, नगरसेविका सविता सदाफळ, वीरभद्र देवालय ट्रस्टचे अध्यक्ष मेचे आदी उपस्थित होते.
राहाता शहर विकासाचे ‘रोल मॉडेल’ ठरेल: डॉ. गाडेकर “जनतेने नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्हाला सत्ता दिली. विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पालिकेला आधीच फायर व रेस्क्यू वाहन, महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा बल मिळाले आहे. विखे पाटील परिवाराने शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला असून, येत्या पाच वर्षांत राहाता शहर राज्याच्या नकाशावर विकासाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून उदयास येईल,” असा विश्वास नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी व्यक्त केला.