Headlines

अमरावतीत 58 तक्रारींवर जनसुनावणी पूर्ण:राष्ट्रीय महिला आयोगाचा संवाद, पीडितांना न्याय मिळवून देण्याची दिली हमी‎




राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने गुरुवार ३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनसुनावणी घेण्यात आली. यात ५८ तक्रारी विचारात घेण्यात आल्या. विशेष म्हणजे उपस्थित सर्व तक्रारदारांशी आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्तिशः संवाद साधून त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांना निर्देश दिले. जनसुनावणीच्या वेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक महेश पाटील, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्यासह आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. जनसुनावणीसाठी आलेल्यांची नोंदणी करून त्यांना टोकन क्रमांक देण्यात आले. नियोजन भवनात दोन पॅनेल करून उपस्थित महिलांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. त्यानंतर संवेदनशील प्रकरणी आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रहाटकर यांनी तक्रारदारांशी व्यक्तिशः संवाद साधला. जनसुनावणीत प्रामुख्याने पॉश, नातेसंबंधातील तडजोडीची प्रकरणे, घरगुती हिंसाचार आदी प्रकरणे समोर आली. काही प्रकरणी तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेऊन रहाटकर यांनी पोलिसांना तात्काळ गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. तसेच त्याची प्रत सादर करण्यास सांगितले. तडजोडीच्या प्रकरणात काहींनी एकत्र राहण्याचे मान्य केले. जनसुनावणीत आलेली प्रकरणे ऐकून त्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या प्रकरणांचा मागोवा घेतला जाणार आहे. यातून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. गुन्हा नोंदवल्यानंतर चार्जशीट दाखल करण्यापर्यंत पाठपुरावा केला जाणार आहे. ‘वन स्टॉप सेंटर’बाबत जनजागृतीचे निर्देश शासनाच्या महिला-केंद्रित योजनांचा लाभ प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन रहाटकर यांनी केले. येथील महसूल भवन येथे आयोजित बैठकीत त्यांनी महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. लैंगिक छळ प्रतिबंधक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. या योजनेबाबत जनजागृती करण्यात यावी. तेथील सेवांची वेळोवेळी तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *