Headlines

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली:ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू; सर्व नियोजित कार्यक्रम रद्द




राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील सततची धावपळ यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी विधिमंडळातच भरला होता ताप मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. तरीही त्यांनी काम सुरू ठेवले, मात्र रात्री उशिरा त्रास वाढल्याने त्यांना तातडीने ठाण्यातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत असून तूर्तास काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ विश्रांती आणि आवश्यक उपचारांसाठी त्यांना दाखल केले आहे. बैठका रद्द प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे पुढील सर्व महत्त्वाचे शासकीय दौरे, बैठका आणि राजकीय कार्यक्रम तात्पुरते पुढे ढकलण्यात आले आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ आणि सततच्या धावपळीचा परिणाम? गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आखलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटाचे ६ लोकसभा खासदार आणि मुंबईतील विधान परिषदेचे मोठे नेते सचिन अहिर यांना आपल्या शिवसेनेत दाखल करून घेतले. या मोठ्या राजकीय फेरबदलांमुळे आणि लागोपाठ झालेल्या दिल्ली वाऱ्यांमुळे उपमुख्यमंत्र्यांना विश्रांती मिळाली नव्हती, ज्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असल्याचे बोलले जात आहे. हेही वाचा.. राज्यात पावसाचा जोर कायम: मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार, कोकणात रेड अलर्ट; विदर्भातही पावसाचा जोर राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र नागरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीमधील शाळांना प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *