![]()
संत नगरी प्रसाद मंडळ व चिरंतन फाऊंडेशनद्वारा अकोट ते पंढरपूर दिंडी मार्गावर ५०० पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात येत असून या पर्यावरण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संतश्रेष्ठ श्री वासुदेव महाराज दिंडी सोहळ्याचे पंढरपूरला २६ जूनला प्रस्थान झाले. यानिमित्त अनेक संस्था व सेवा मंडळांकडून विविध धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच अंतर्गत दिंडी मार्गावर ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे, तेथे वृक्षलागवड करण्यात येत आहे. श्री संत नगरी प्रसाद मंडळ अकोट यांच्याद्वारा फिरत्या पानेरी उपक्रमातून पंढरपूर मार्गावरील पायदळ दिंडीतील वारकरी भाविकांना शुद्ध व थंड आरओचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमासोबतच चिरंतन फाउंडेशन अकोट यांच्याद्वारा पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज स्मृती प्रित्यर्थ पर्यावरणपूरक ५०० झाडांची लागवड करण्यात येत असल्याचे अनिल कोरपे यांनी सांगितले. शाळेच्या प्रांगणात १० झाडांची लागवड गुरुवारी अकोला येथे प्रभात किड्स स्कूलच्या प्रांगणात डॉ. गजानन नारे, प्रा. गोपाल झामरे यांचे हस्ते वाक्षकऱ्यांच्या उपस्थितीत १० झाडांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश रुजवण्यात येत आहे.
Source link
दिंडी मार्गावर 500 झाडांची लागवड सुरू:विविध संस्था, सेवा मंडळांकडून सामाजिक, धार्मिक उपक्रमांचेही आयोजन