Headlines

आंतरराष्ट्रीय एकल दिन:सटाण्यात 100 एकल महिलांना शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन




प्रतिनिधी | नांदगाव येथील नगरपरिषदेने एकल महिलांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करत १८४ महिलांची नोंदणी केली तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समुपदेशन केंद्राची स्थापना केली. या उपक्रमाला ७५ हून अधिक एकल महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी नगरपरिषदेद्वारे नोंदणी मोहीम राबविण्यात आली. मेळाव्यात एकल महिलांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा योजना, आर्थिक सहाय्य योजना तसेच महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे एकल महिलांमध्ये शासकीय योजनांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून त्यांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे मत मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी व्यक्त केले. महिला व बालकल्याण सभापती विद्या कसबे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. स्वाती नावंदर आणि रोहिणी मोरे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले. प्रशासकीय अधिकारी हर्षदा राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी आनंद महिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिजला गंगावणे, उषा शिंदे, मनिषा काकळीज आणि आम्रपाली कटारे यांनी परिश्रम घेतल. प्रतिनिधी | सटाणा येथील नगरपरिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त ‘एकल महिला दिवस’ साजरा करण्यात आला. या उपक्रमात १०० हून अधिक एकल महिलांनी सहभाग नोंदवत शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष सुमित वाघ, महिला व बालविकास समितीच्या सभापती कल्पना सोनवणे, गटनेत्या मनिषा पवार, नगरसेविका सुनंदा देवरे, मुख्याधिकारी ज्योती भगत यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, ग्रंथपाल तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मेळाव्यात एकल महिलांना शासनाच्या लोककल्याणकारी, सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध योजनांची माहिती देण्यात आली. उपक्रमामुळे एकल महिलांमध्ये शासनाच्या योजनांबाबत जागरूकता वाढून त्यांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाला बळ मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी व्यक्त केला. एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. सटाणा नगरपरिषदेत एकल महिला सक्षमीकरण कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्षा हर्षदा पाटील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *