![]()
मुंबई येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर आज तिरंगा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईमधील जी मोकळे मैदान होती, ती पुन्हा एकदा मुलांसाठी मोकळी उपलब्ध मिळायला हवीत या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हे आंदोलन केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजप तसेच महायुती सरकारवर टीका केली आहे. सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आज आपण इथे सगळे जमले आहोत एकाच कारणामुळे ते म्हणजे मुंबईतले मोकळे मैदान, हे मोकळे मैदान राहिलेच पाहिजेत या साठी. गेल्या 4 वर्षांत ही मुंबई बदलायला लागली आहे. आम्ही हा लढा जेव्हापासून सुरू केला आहे, 4 वर्षांत जवळपास 15 पेक्षा जास्त मैदाने कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल केली आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की मैदान ही मैदानच राहिली पाहिजेत. मुंबई महापालिकेच्या चौकात आंदोलनाचा इशारा पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आज 17 मैदानांची रूपरेषा बदलून तिथे रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्रॉपर्टी होणार आहे. मुंबईत जी कोणती मैदाने होती ती कमी होत आहेत. झाडे कमी होत आहेत. विकास झाला पाहिजे, त्यात काही शंका नाही, मात्र आपली मैदाने जी आहेत ती राहिली पाहिजेत. आज आपण ज्या मैदानावर उभे आहोत, हा 6 एकरचा प्लॉट आहे. आज ते दावे करत आहेत की हा भूखंड फुटबॉलसाठी दिला. मात्र त्यांनी फक्त इथली मधली जागा दिली आहे. ही लढाई आज सुरू झाली आहे. आपल्या मोकळ्या मैदानांसाठी आपण लढत राहू आणि जोपर्यंत आम्हाला आमची मैदान मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही महापालिकेच्या चौकात येऊन बसू, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. मी पर्यावरणमंत्री असताना अर्बन फॉरेस्ट तयार केले होते आदित्य ठाकरे म्हणाले, पाली हिलमध्ये देखील मोकळे मैदान होते, मात्र तिथे आता बांधकाम सुरू केले आहे. आम्ही तिथे पण येणार आहोत. आजकाल विंग्जमध्ये खेळायला जावे लागते, आधी इथे मोफत खेळता येत होते. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुद्धा कमर्शियल करण्यात येत आहे. मी पर्यावरणमंत्री असताना अर्बन फॉरेस्ट तयार केले होते, आता तिथे काय केले जात आहे? तो प्लॉट एका ट्रस्टला दिला जात आहे. आपण या विरोधात लढले पाहिजे. आपण मुंबईचा जेव्हा जेव्हा विचार केला, तेव्हा आपण या मुंबईसाठी खूप काही केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तराचे फुटबॉल ग्राऊंड आपण तयार केले होते. दुसरी गोष्ट म्हणजे नवी मुंबईला सिडको महाराष्ट्र फुटबॉल सेंटर ऑफ एक्सलेन्स सुरू केले. विकास हा शाश्वत असला पाहिजे पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आज मी सगळ्यांना विनंती करत आहे, आज मुंबईत अनेक मोठे प्रकल्प येत आहेत. पण विकास हा शाश्वत असला पाहिजे. आपल्याकडे पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने आज आपण फुटबॉलमध्ये 138 क्रमांकावर आहोत. खेळाडू चांगले आहेत, कोचेस चांगले आहेत, मात्र चांगल्या मैदानांचा अॅक्सेस नाही. मुख्यमंत्र्यांच्या युवा संवादावर टीका आदित्य ठाकरे म्हणाले, आज मी कुठेतरी ऐकले की मुख्यमंत्री जेन-झीसोबत संवाद साधत होते आणि तेव्हा त्यांनी म्हटले होते की नक्कीच मुलांनी स्क्रीन पेक्षा मैदानावर असावे, असे फडणवीस साहेब बोलले. अहो मुख्यमंत्री साहेब मैदान तुम्ही ठेवताय कुठे? ही मागची एसआरए तुमच्या मित्राच्या घशात टाकले आहे, मुंबईतले अनेक जागा भाजपच्या नेत्यांना देण्यात आले असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की या आंदोलनाला आपण नाव दिले आहे ऑपरेशन रेड कार्ड.
Source link
मुंबईतील मोकळ्या मैदानांसाठी आदित्य ठाकरेंचे 'तिरंगा आंदोलन':अनेक भूखंड गिळंकृत केल्याचा आरोप; मुख्यमंत्र्यांच्या युवासंवादावरही साधला निशाणा