![]()
मंत्र्यांपासून तर सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वांनी काटकसर केली पाहिजे. अमेरिका-इराण युद्ध वाढले तर देशात इंधन टंचाई येऊ शकते, त्यामुळे बचत करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, त्यांच्या या सांगण्याचा कोणी बाऊ करू नये, आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका सुद्धा करू नये, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. एकट्यासाठी कार वापरण्यापेक्षा मेट्रोने प्रवास करावा. पंतप्रधान यांच्या आवाहनाचा आपण सन्मान करायला हवा. यापूर्वी सुद्धा असे विधान माजी पंतप्रधानांनी केले आहे, त्यावेळी विरोधकांनी टीका का केली नाही. संजय शिरसाट म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. ते जगात जी परिस्थिती सुरू आहे त्यामुळे केले आहे. इराण-अमेरिका युद्धाचा भडका वाढत आहे. जर युद्ध लांबत गेले तर देशामध्ये सप्लाय थांबला तर मोठे संकट येणार ही चाहूल लागल्याने काटकसर करा हे म्हटल्यामुळे एवढा इशू करण्याचे काही काम नाही. रोजच्या जीवनात थोडी बचत केली तर देशाची सेवाच आहे, मोदींनी सांगितले म्हणून त्यांच्यावर टीका करण्याचे काही कारण नाही. मतीन पटेलची दुटप्पी भूमिका संजय शिरसाट म्हणाले की, निदा खान प्रकरणामध्ये निदा ही मतीन पटेलच्या घरात सापडली. तिच्यासेाबत तिचे आई, मावशी, भाऊ, वडील सुद्धा होते. जवळपास 35 दिवस ती तिथे मुक्कामी होती. चौकशीमध्ये ते घर मतीन पटेल यांचे आहे हे समोर आले. त्यावर मनपाने कारवाई करत त्यांना नोटीस बजावली आहे. एखादे अतिक्रमण पाडतांना नोटीस देत कागदपत्रे मागूण घेणं आणि ते जर अनाधिकृत असेल तर कारवाई करत असतात. हे लोकं एकीकडे घर माझे नाही असे म्हणतात तर दुसरीकडे घर पाडू नका म्हणून कोर्टात जात आहेत, ही दुटप्पीपणा त्याच्या अंगलट येणार आहे. मनपा आज कारवाई करेल असे मला वाटते. निदा खान एक पेड वर्कर संजय शिरसाट म्हणाले की, निदा खान एक पेड वर्कर आहे अशा अनेक निदा खान महाराष्ट्रामध्ये आहेत. हे काही छोटे प्रकरण नाही. धर्मांतराची एक मोहिम एमआयएमने इतरांच्या साथीने राबवली आहे. लव्ह असो की धर्मांतर असो की ड्रग्जचा विषय असो यामध्ये माजी खासदार जलील आणि त्यांची गँग सहभागी आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर जलील जेलमध्ये जाणार असे शिरसाट यांनी म्हटले आहे. देशात छुप्या कारवाया सुरू संजय शिरसाट म्हणाले की, नाशिकमधील जिहाद प्रकरण हे काही एका व्यक्तीचे काम नाही, यामागे मोठी टोळी आहे. हे आंतरराष्ट्रीय लेव्हलवरचे रॅकेट आहे, या देशामध्ये अतिरेकी आणि दुसरी छुपी कारवाई केली जाते. यांना अनेक ठिकाणाहून फंड मिळतात. लव्ह जिहाद प्रकरणामध्ये सुद्धा असेल फंडिग केले जाते, हे सिद्ध झाले आहे. निदा खानला सुद्धा फंड दिला जात होता हे सिद्ध झाले आहे. निदाला उघडपणे पाठिंबा देणारे सुद्धा यामध्ये कुठेतरी सहभागी आहेत. आरोपीला मोकळे सोडता येत नाही संजय शिरसाट म्हणाले की, औवेसीला कायदा कळत नाही का? FIR फाटला म्हणजे तो व्यक्ती आरोपी होतो. तो आरोप सिद्ध झाला की कोर्टात शिक्षा होत असते, म्हणून आरोपीला मोकळे सोडता येत नाही. अनेक आरोपी आहेत ज्यांना शिक्षा झालेली नाही पण ते जेलमध्ये आहेत हे औवेसीला माहिती नाही का? धर्मांच्या नावाने इतर धर्मांच्या लोकांना बाटवण्साचे काम त्यांनी सुरू केले आहे, आता त्याचा छडा लागण्याशिवाय राहणार नाही. कोणीही अतिक्रमण करू नये संजय शिरसाट म्हणाले की, कोणत्याही नगरसेवकाने अतिक्रमण करू नये. करणाऱ्यांना पाठिंबा सुद्धा देऊ नये.कारण त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद सुद्धा रद्द होऊ शकते. हे काही एका पक्षासाठी नाही तर सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना सांगणे आहे. त्यांनी या भानगडीत पडू नये.
Source link
इंधन बचतीचे पंतप्रधानांचे आवाहन देशाच्या हिताचे; उगाच बाऊ करू नका:निदा खान एक 'पेड वर्कर'; महाराष्ट्रात धर्मांतराचे मोठे रॅकेट- संजय शिरसाट