![]()
उन्हाळा म्हटलं की प्रचंड उकाडा, त्यातल्या त्यात विदर्भाचा उन्हाळा म्हटल की आग ओकणारा सूर्य कोणालाही शहारे आणतो. अशा उन्हाळ्यात आपल्या स्वास्थ्याची योग्य काळजी घेण्याची विशेष आवश्यकता आहे. कारण, उन्हाळात पचन शक्ती ही काहीशी कमकुवत होते. परिणामी पचन शक्ती कायम ठेवत आरोग्य लाभ व्हावा, यासाठी आपण दक्ष राहणे गरजेचे आहे. रसाळ, मधूर फळे, हिरव्या मोसमी पालेभाज्या व फळ भाज्यांचे नित्य सेवन सतत करायला हवे. सोबतच ओलावा असलेली रसदार फळे आवर्जून सेवन करायला हवे. अती थंड शितपेटीमधले पाणी न पिता मातीच्या माठातील गार पाण्याला आपण पसंती द्यायला हवी जेणेकरून तहान कमी लागेल. सध्या लग्न सराई जोरात सुरू आहे. कारण, येत्या १६ मेपासून अधिक महिना सुरू होत आहे. त्यामुळे सर्वांनाच सध्या लगीनघाई झाली. हळद, संगीत, लग्न, स्वागत समारंभात तयार केल्या जाणाऱ्या पक्वान्नांमध्ये तेलकट पदार्थांचा समावेश असतो. ते आपण आवडीने खातो. मात्र, या पदार्थांमधील सोड्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. सोडा, शीतपेय असे कार्बोनेटेड पेय प्राशन केल्यानंतर शरीरातील उष्णता कमी होते असा गैरसमज आहे. म्हणून असे शीतपेय पिणे टाळले पाहिजे असा सल्ला डॉ.पंजाबराव देशमुख मेडिकल महाविद्यालयातील आहारतज्ञांनी दिला आहे. कांदा, कैरीमुळे जेवण रुचकर लागते उन्हाळ्यात कांदा, कैरीचे आहारात सेवन केल्याने जेवण रूचकर लागते. त्यामुळे शरीरातील उष्णताही कमी होते. कांदा हा थंड असून त्यात पाण्याचे प्रमाणे असते. कांद्यामुळे प्रत्येक घास हा चवदार वाटतो. कच्ची कैरी तर तोंडाला पाणीच सोडते. आंबट कैरीमुळे तोंडाला चव येते. त्यामुळे दोन घास जास्त पोटात जातात, असेही आहारतज्ज्ञांनी सांगितले. सतत पाणी पिणे आवश्यक उन्हाळ्यात पचन शक्ती मंदावत असल्याने भूक कमी लागते. अशा वेळी सतत पाणी पित राहणे शरीरासाठी हितकारक आहे. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण हे कायम राखता येते. तसेच दिवसात अधेमधे फळांचा रस, लिंबूपाणी, ताकही घ्यायला हवे. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मुल्ये मिळतात. डॉ.उज्ज्वला ढेवळे , आहारतज्ज्ञ
Source link
उन्हाळ्यामध्ये कार्बोनेटेड पेय कटाक्षाने टाळा:आहारतज्ज्ञांचे मत, नैसर्गिक, फळांचे पेय, पदार्थांचा आहारात समावेश करण्याच्या सूचना