![]()
वारंवार सांगूनही भौतिक सुविधांचा अभाव, मान्यताप्राप्त आणि तज्ज्ञ शिक्षक नाहीत. गैरप्रकार या सर्व त्रुटींमुळे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) २०२५-२६ शैक्षणिक वर्षात देशातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालय टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ९५० अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. ही महाविद्यालये पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांतील आहेत. एआयसीटीईच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार देशभरातील ५८ महाविद्यालये बंद केली आहेत. प्रथम वर्षाचे प्रवेश मात्र या महाविद्यालयांना करता येणार नाहीत. मात्र, तेथे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरू राहतील, असे तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. एआयसीटीईने बंद केलेल्या यामध्ये ३ महाविद्यालये शासकीय अनुदानित आहेत. उर्वरित खासगी आहेत. एक्स्पर्ट व्ह्यू – डॉ. उल्हास शिऊरकर, माजी प्राचार्य असुविधांमुळे महाविद्यालये बंद अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एआयसीटीईने दिलेल्या नियमानुसार अभ्यासक्रम, तज्ज्ञ प्राध्यापक, भौतिक सुविधा, विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे. जर या संबंधीची माहिती चुकीची दिली तर कारवाई होते. मात्र यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाते. बंद होणाऱ्या महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभावामुळेच कारवाई झाली आहे.
Source link
एआयसीटीईचा निर्णय; यंदा पहिल्या वर्षाचे प्रवेश बंद:गैरप्रकार, शिक्षकांचा अभाव; राज्यातील 12 अभियांत्रिकी महाविद्यालयांना टाळे