![]()
भाजप नेते आणि आमदार नीतेश राणे यांनी एआयएमआयएम पक्ष आणि त्याचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर अत्यंत बोचरी आणि खळबळजनक टीका केली आहे. ओवेसींची तुलना थेट दहशतवादी ओसामा बिन लादेनशी करतानाच, ‘एमआयएम’ ही एक दहशतवादी संघटना असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या संघटनेवर केंद्र सरकारने तात्काळ बंदी घालावी, अशी आक्रमक मागणीही राणे यांनी केली असून यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माध्यमांशी बोलताना नीतेश राणे यांनी ओवेसी आणि त्यांच्या पक्षावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “ओसामा बिन लादेन आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात कोणताही फरक नाही. जे काम लादेन अल-कायदाच्या माध्यमातून करायचा, तेच काम आता ओवेसी ‘एमआयएम’च्या माध्यमातून करत आहेत. या लोकांनी निवडून आल्यापासून समाजहिताचे एकही काम केलेले नाही. त्यांच्या जाहीरनाम्यात आणि भाषणांमध्ये फक्त ‘जिहाद’ पुकारण्याचाच अजेंडा असतो.” PFI च्या धर्तीवर बंदीची मागणी नीतेश राणे यांनी यावेळी केंद्र सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. “ज्या पद्धतीने केंद्र सरकारने पीएफआय (PFI) या देशविघातक संघटनेवर बंदी घातली, त्याच धर्तीवर एआयएमआयएम या संघटनेवर देखील तात्काळ बंदी घालण्यात यावी. ही संघटना समाजासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे,” असे विधान त्यांनी केले. मुस्लीम नेते निदा खानचे समर्थन का करताय? दरम्यान, निदा खान मुस्लीम महिला असल्याने तिला टार्गेट केले जात असल्याचा आरोप वारिस पठाण यांनी केला आहे. याबाबत नीतेश राणे यांना विचारले असता, आम्ही अशोक खरातचे समर्थन केले का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यामुळेच आम्ही आमच्या हिंदू धर्माला मोठे मानतो. अशोक खरातसारख्या व्यक्तीने हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, हिंदू माता-भगिनींचे आयुष्य उद्ध्वस्त केले. या प्रकरणात कोणत्याही हिंदू नेत्याने किंवा हिंदू समाजाच्या एका व्यक्तीने समोर येऊन अशोक खरातचे समर्थन केले नाही. अशोक खरातला फासावर चढवा, अशी आमच्या हिंदू समाजातील प्रत्येकाची भूमिका आहे. अशाचप्रकारे वारिस पठाणसारखे लोक निदा खानच्या बाबतीत अशी भूमिका का घेत नाहीत? यालाच इस्लाम म्हणतात का? असा सवाल नीतेश राणे यांनी केला. बुरखा अन् धार्मिक पुस्तके बाळगणे गुन्हा कधीपासून झाला? : ओवैसी या प्रकरणावर भाष्य करताना ओवैसी पत्रकार परिषदेत म्हणाले होती की, टीसीएस प्रकरणाला एमआयएमशी जोडणे चुकीचे आहे. सुशिक्षित मुस्लिम मुलामुलींना त्रास देण्यासाठी हा कट आहे. निदाचा एचआर विभागाशी कोणताही संबंध नव्हता, असे टीसीएसच्या निवेदनात सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील तक्रारदार हा सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित आहे. निदाच्या घरातून बुरखा, नकाब, पैगंबर मोहम्मद यांचे पुस्तक जप्त झाले. धर्माचे पुस्तक बाळगत असेल तर ते बेकायदेशीर कसे ठरू शकते? न्यायालयात निदा निर्दोष मुक्त होईल, असेही ते म्हणाले.
Source link
एमआयएम ही दशतवादी संघटना:असदुद्दीन ओवैसी आणि लादेनमध्ये फरक काय? दोघेही सारखेच, नीतेश राणे यांचा गंभीर आरोप