![]()
भारताची ज्या गोष्टीमुळे झोप उडाली होती, अखेर तीच धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत महासागरामध्ये ‘एल निनो’ ही हवामान प्रणाली पूर्णपणे सक्रिय झाली असून, त्याचे थेट संकट आता भारतावर धडकले आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशन (ESSO) च्या हवामान तज्ज्ञांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या संकटामुळे देशातील मान्सून धोक्यात आला असून अनेक राज्यांवर भीषण दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशांत महासागरात एल निनोचे थैमान, भारताला फटका नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर मान्सून अत्यंत प्रतिकूल परिणाम करणारी ‘एल निनो’ प्रणाली सक्रिय झाल्यामुळे हवामान तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात होणाऱ्या बदलांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होत असून, येत्या काही दिवसांत हा प्रभाव अधिक भयंकर रूप धारण करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. यंदा मान्सूनच्या प्रगतीत काही भागांत विलंब दिसून येत असून अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. हवामान विभागाच्या मते, पुढील काही दिवसांत मान्सूनच्या हालचालींवर आणि एल निनोच्या प्रभावावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
एल निनोच्या संभाव्य प्रभावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे सांगितले. बजेट भाषणातही याचा उल्लेख केल्याची आठवण करून देत त्यांनी जलसंधारणावर विशेष भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्टे देऊन लहान जलसंधारण प्रकल्प पूर्ण करण्याचे काम सुरू असून, संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता पशुसंवर्धन व कृषी विभागामार्फत वैरण विकास कार्यक्रमही राबवला जात आहे. पावसाचे संकेत चिंताजनक असल्याचे मान्य करताना फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता राज्य सरकारच्या कृषी सल्ल्यानुसारच पेरणी करावी. एसएमएस, महाविस्तार ॲप आणि विविध माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास दुबार पेरणीची वेळ टाळता येईल, असे आवाहनही त्यांनी केले. दिल्लीत पावसामुळे विमानांना उशीर:मध्य प्रदेशात पावसामुळे 4 मृत्यू; यूपीच्या हाथरसमध्ये रस्ते पाण्याखाली, लखनऊमध्ये दिवसा अंधार पसरला दिल्लीत शनिवारी सकाळी पावसामुळे अनेक विमानांना उशीर झाला. इंडिगो एअरलाइन्सने X वर पोस्ट करून सांगितले की, खराब हवामानामुळे विमानांच्या वेळेवर परिणाम झाला आहे. आम्ही हवामानावर सतत लक्ष ठेवून आहोत. मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसामुळे एकाच कुटुंबातील ३ जणांसह ४ लोकांचा मृत्यू झाला. यूपीच्या हाथरसमध्ये कोतवाली सदरमध्ये पाणी भरले. रस्ते पाण्याखाली गेले. सविस्तर वाचा
Source link
एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता:मॉन्सूनच्या प्रगतीवर परिणाम होणार? हवामान तज्ज्ञांचे निरीक्षण, सरकार अलर्ट मोडवर