Headlines

पुणे जिल्हा परिषदेत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न:लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्ष आयुष्याशी खेळ, राष्ट्रवादीच्या मंगेश जगतापांवर गंभीर आरोप




बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर एका राजकीय पक्षाच्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. अनेक वर्ष आपली फसवणूक झाली असून न्याय मिळत नसल्याने 27 जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान या तरुणीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी तिथे उपस्थित पोलिस व सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सध्या या तरुणीवर उपचार सुरू आहेत. या तरुणीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समजल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील जिल्हा परिषदेत पोहोचल्या. त्यानंतर त्यांनीच या तरुणीला रुग्णालयात दाखल केले. यावेळी या तरुणीने एका वृत्तवाहिनीला बोलताना नेमके प्रकरण काय आहे, याविषयी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, मंगेश प्रताप जगताप व त्यांची संपूर्ण फॅमिली यात आहे. त्याची मेव्हणी पोलिस आहे, त्याचे मित्र.. या सगळ्यांना हा प्रकार माहीत आहे. गेली 3 महीने झाले मी वाट पाहतिये आणि तो तीन महिन्यांपासून गायब आहे. मी दिसले की तो पळून जातोय, असा आरोप या तरुणीने मंगेश जगताप यांच्यावर केला आहे. 21 वर्षांपासून आम्ही सोबत होतो.. पुढे या तरुणीने सांगितले की, मला एकच प्रश्न आहे, याच्या जागी मुस्लिम मुलगा असला असता, तर तुम्ही हिंदू मुस्लिम करून त्याचे घर जाळले असते. मग याला काय करणार आहात? 21 वर्षांपासून आम्ही सोबत होतो, आता महाबळेश्वरला रिसॉर्ट सुद्धा बूक केला होता, 29, 30 तारीख देखील काढली आहे. त्यानेच ही तारीख काढली आहे. या संगल्याचे पुरावे आहेत माझ्याकडे, असे या तरुणीने म्हटले आहे. 21 वर्ष का दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळला? मंगेश जगताप यांनी त्यांच्या मित्रासोबत एक मेसेज पाठवला होता की हे डॉक्युमेंट फेक आहेत. मग 21 वर्ष का दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळला मग? असा सवाल या तरुणीने उपस्थित केला आहे. त्यानंतर रुपाली ठोंबरे ज्या तिथेच उपस्थित होत्या, त्यांनी सांगितले की, आधी या दोघांचे प्रेम प्रकरण होते. नंतर त्याने दुसरीकडे लग्न केले. त्यानंतर त्याने डिवोर्स घेतोय असे सांगितले आणि त्याचे पेपर सुद्धा दाखवले. त्याने डिवोर्सचे खोटे कागदपत्र दाखवले पुढे तरुणीने असेही सणगीतले की, 2007 पासून आम्ही सोबत होतो. त्याने मला लग्न सुद्धा करू दिले नाही. मी घरच्यांशी भांडून कुठे लग्न देखील केले नाही. अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी नसावा. याच्यात फारच खुमखुमी आहे न राजकारणाची तर याने परत निवडणुकीला उभे राहावे. मग कळेल त्याची लायकी काय आहे. त्याने खोटे कागदपत्र दिले होते. आत्ता परवा त्याने सांगितले की हे पेपर खोटे आहेत आणि याचा मोठा धक्का बसला आणि यातूनच हे पाऊल उचलले गेल्याचे या तरुणीने सांगितले आहे. दरम्यान, आता मंगेश जगताप यांच्यावर काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्यपद राहणार की जाणार आणि पक्षाकडून देखील काय कारवाई होते, याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *