Headlines

सीबीआय आदित्य ठाकरेंना अटक करू शकते:मंत्री नितेश राणेंचे मोठे विधान, दिशा सालियन प्रकरणी काय म्हणाले राणे?




दिशा सालियन प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू असून ते न्यायप्रविष्ट असल्याने बाहेरील व्यक्तींनी त्यावर भाष्य करू नये. मात्र, संजय राऊत, सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरे या प्रकरणावर जेवढे बोलून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सीबीआयला आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांची कस्टोडिअल चौकशी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही आणि कायद्यात तशी तरतूदही आहे, असे मोठे विधान भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. राणे यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. नितेश राणे म्हणाले, संजय राऊत, सुषमा अंधारे किंवा उद्धव ठाकरे असो. हे तिन्ही लोक जेवढे या प्रकरणावर बोलतील, जेवढा दबाव टाकतील आणि सतीश सालियन यांच्यावर जेवढा दबाव टाकतील, तेवढ्या त्यांच्याच अडचणी वाढतील. ज्याच्यावर आरोप असतो आणि जो ताकदवर असतो, तोच दबाव टाकू शकतो. अशा प्रकरणात अंडर ट्रायल किंवा कस्टोडियन चौकशी होत असते. म्हणजेच आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करणे याच्याशिवाय सीबीआयकडे दुसरा पर्याय राहत नाही. अटक करून चौकशी करण्याची कायद्यात तरतूद तसेच आदित्य ठाकरेंना अटक व्हावी असे राऊत आणि अंधारेंना वाटत असेल तर त्यांनी बोलत राहावे. अशा परिस्थितीत सीबीआयकडे पर्याय राहत नाही. हे लोक बाहेर राहून, अशी विधाने करत आहेत. त्याने सतीश सालियन यांच्यावर दबाव येतोय. म्हणून अशा परिस्थिती अटक करून चौकशी करण्याची तरतूद कायद्यात आहे, असे विधान नितेश राणे यांनी केले आहे. दरम्यान, सालियन प्रकरणात चारित्र्यहनन केले तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यावर नितेश राणे म्हणाले, मी गणपती उत्सवात बिझी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे हे विधान मी ऐकले नाही. पण ते असे म्हणाले असतील तर त्यात काही नवीन नाही. आदित्य ठाकरे यांच्या वतीने अशाच पद्धतीचे विधान कोर्टात यापूर्वीही केले गेले आहेत. आमचा सालियन प्रकरणाशी संबंध नाही. आम्हाला या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असे त्यांनी कोर्टात म्हटले होते. कोर्टाने त्यांचे म्हणणे फेटाळून लावले. त्यानंतर कोर्टाने दिशांच्या वडिलांच्या बाजूने निर्णय दिला, अशी माहिती राणे यांनी दिली. ठाकरेंकडून न्यायालयाचा अवमान, राणेंचा आरोप दिशा सालियन प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे न्यायालयाने नाकारलेले मुद्दे वारंवार मांडून न्यायालयाचा अवमान (कंटेम्प्ट ऑफ कोर्ट) करत आहेत. सहा वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांवर राज्यकर्त्यांचा प्रचंड दबाव असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकली नाही आणि पुरावेही नष्ट करण्यात आले. मात्र, आता पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसून उपलब्ध पुरावे आणि धाग्यादोऱ्यांच्या आधारे सखोल चौकशी होत असल्याने दिशा सालियनला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *