Headlines

गावी आलो, दिल्लीत गेलो किंवा लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी:आता त्यांना जमाल गोटाच द्यावा लागेल; एकनाथ शिंदेंचा दरे गावातून टोला




गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी, दरे येथे आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जागतिक बांबू लागवड दिवसा’चे औचित्य साधून विविध मुद्द्यांवर भाष्य केले. दरे गावातील शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करणाऱ्या शिंदे यांनी यावेळी राजकीय विषयांवरही रोखठोक मते मांडताना, त्यांच्या लंडन दौऱ्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, मी गणेशोत्सवानिमित्त दरे गावी आलेलो आहे, नाराज नाही. परंतु, मी या भागात आल्यानंतर नेहमीच लोकांना पोटदुखी होते. त्यामुळे आता मी पोटदुखीवर सुद्धा कोणते झाड आहे का ते बघणार आहे आणि त्याची सुद्धा लागवड करणार आहे. किंवा त्यांना जमाल गोटा दिला पाहिजे, असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच ते म्हणाले, गावी आलो, दिल्लीत गेलो आणि लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी होते. विरोधकांच्या आरोपाळा टीका करून उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देईल. मी कामाचा माणूस आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. दुष्काळी भागांचा दौरा करणार महाराष्ट्रातील दुष्काळ सदृश परिस्थितीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात काही ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आमचे पालकमंत्री हे त्या भागांचे दौरे करत आहेत आणि लवकरच मी सुद्धा दुष्काळी भागांचा दौरा करणार आहे. जी पिके करपून गेली आहेत, तिथे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशा सूचना दिल्याचे शिंदे यांनी दिल्या असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. जागतिक बांबू लागवड दिवसानिमित्त बांबू लागवड तसेच पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, बांबूपासून इथेनॉल, एअरपोर्टची कामे केली जातात, अनेक उपयोगी वस्तू तयार केल्या जातात. बांबूवर लक्ष केंद्रित करून लागवड केली पाहिजे, असा सल्ला शिंदे यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शेतात जागतिक बांबू लागवड दिवसानिमित्त बांबू लागवड केली आहे. याचसोबत त्यांच्या शेतात सफरचंद, ब्ल्यु बेरी, कापुर आणि हिंग या दोन नवीन झाडांची लागवड केली आहे. हेही वाचा.. लंडनहून परतताच एकनाथ शिंदेंचा मोबाईल विमानातच राहिला:रात्री 3 वाजता लक्षात आलं, पहाटेपर्यंत यंत्रणांची धावपळ
आठवड्याभराचा ब्रिटन दौरा यशस्वीरीत्या पूर्ण करून मुंबईत परतलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा मोबाईल फोन ब्रिटिश एअरवेजच्या विमानातच राहिल्याची घटना मध्यरात्री घडल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई विमानतळावरून घरी पोहोचल्यानंतर पहाटे 3 वाजता मोबाईल नसल्याचे लक्षात येताच सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी विमानतळावरील सुरक्षा पथकाशी समन्वय साधून पहाटे 4 वाजता मोबाईल शोधून काढल्याचे सांगण्यात आले. तथापि, या संपूर्ण घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला असून, मोबाईल गहाळ झाल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *