Headlines

मराठवाडा अर्बन बँक्स असोसिएशनच्या संचालकपदी हिंगोलीचे दिलीप चव्हाण:सुनील देवडा आणि गोपाल अग्रवाल यांचीही बिनविरोध निवड




मराठवाडा अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि.च्या संचालकपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत हिंगोलीचे दिलीप चव्हाण, सुनील देवडा आणि गोपाल अग्रवाल यांची शुक्रवारी ता १८ बिनविरोध निवड झाली आहे. मराठवाड्यातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राशी संबंधित संस्थांच्या विकासासाठी तसेच सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. या असोसिएशनच्या २१ संचालकांच्या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या निवड प्रक्रियेमध्ये २१ जागांसाठी १८ जणांनीच उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे या असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे. या संघटनेच्या तीन जागा रिक्त राहिल्या आहेत. दरम्यान या निवड प्रक्रियेमध्ये आज संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये हिंगोली येथील राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, ओमप्रकाश देवडा बँकेचे उपाध्यक्ष सुनील देवडा आणि गोपाल अग्रवाल ( जवळा बाजार) यांचा समावेश आहे. या निवडीमुळे मराठवाड्यातील अर्बन बँकांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच बँकिंग व सहकार क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्नांना बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीबद्दल हिंगोली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे या निवडीबद्दल बोलताना दिलीप चव्हाण म्हणाले की, या संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील अर्बन बँकांचे प्रश्न मांडून त्यांची सोडून करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *