![]()
एकास मारहाण करून त्याच्या ऑफिसचे नुकसान केल्याप्रकरणी 12 जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पांडुरंग आप्पासाहेब डंबाळे ( रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) यांना तसेच त्यांच्या वडिलांना 15 सप्टेंबर रोजी झालेल्या वादाच्या कारणातून तेथीलच निलेश कणसे, सचिन कणसे व इतर दहा ते बारा लोकांनी मारहाण, शिवीगाळ करून त्यांच्या ऑफिसचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत. मतिमंद अल्पवयीन मुलीचे अपहरण मतिमंद अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या साडेतेरा वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तिच्या पालकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत. सातारा शहरासह तालुक्यातील दोन जणांचे अपहरण; अज्ञातावर गुन्हा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण झाल्याच्या फिर्यादी सातारा शहर , तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सिद्दिक सिकंदर बागवान रा. म्हसवे, ता. सातारा या युवकाचे राहत्या घरातून अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार यु. बी. माने करीत आहेत. दुसऱ्या घटनेत, किरण सुरेश सावंत रा. गुलमोहर सोसायटी, शाहूपुरी, सातारा यांचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत. अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास किसन रामचंद्र बेडेकर रा. ठोसेघर, ता. जावली हे तेथेच अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 2880 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. गळफास घेऊन एकाची आत्महत्या गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या पूर्वी प्रदीप शंकर पवार (रा. नागठाणे, ता. सातारा ) यांनी एका गुरांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.
Source link
सातारा गुन्हेगारी वार्ता:मारहाण तसेच नुकसान प्रकरणी 12 जणांवर गुन्हे; मतिमंद अल्पवयीन मुलीचे अपहरण