![]()
तालुक्यातील ताडपिंपळगाव येथील युवा शेतकरी सागर राजेंद्र सोनवणे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत आयोजित सोहळ्यात राज्यपाल जिष्णूदेव वर्मा आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सागर यांनी प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा, पीएसबी, मेटारायझियम यांसारख्या उच्च दर्जाच्या जैविक खते व कीटकनाशकांची निर्मिती करून सेंद्रिय शेतीला नवी दिशा दिली. सागर यांनी १०० हून अधिक कृषी लेख लिहिले असून, करिअर महाकोश पुस्तकाचे लेखनही केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे, तहसीलदार सारिका भगत यांनी अभिनंदन केले.
Source link
कन्नड येथील सागर सोनवणे यांना युवा शेतकरी पुरस्कार:कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित