Headlines

खरीपाच्या पेरण्यांना ब्रेक; 6.74 लाख हेक्टरपैकी फक्त 2.89% क्षेत्रावर पेरणी:11 वर्षांतील जूनमधील सर्वात कमी पावसाचा फटका‎




जिल्ह्यात मान्सून लांबल्याचा सर्वाधिक फटका यंदाच्या खरीप हंगामाला बसला आहे. जूनचे २६ दिवस उलटूनही जिल्ह्यात केवळ ४१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने खरीपाच्या पेरण्यांना अक्षरशः ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील ६ लाख ७४ हजार ४६१ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ १९ हजार ४६८.९२ हेक्टरवर म्हणजेच अवघ्या २.८९ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. गेल्या ११ वर्षांतील हा जूनच्या २६ दिवसांतील सर्वात कमी पाऊस ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होतो. यंदा मात्र पहिला समाधानकारक मान्सूनचा पाऊस २२ जूनला झाला. त्यानंतरही सर्वदूर पाऊस न झाल्याने जमिनीत आवश्यक ओल निर्माण झाली नाही. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू ठेवली आहे. गेल्या वर्षी परिस्थिती याच्या नेमकी उलट होती. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली होती. त्यामुळे २६ जूनअखेर सुमारे तीन लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने हा वेग पूर्णपणे मंदावला आहे. गेल्या ११ वर्षांच्या नोंदीतही यंदाची स्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. २६ जूनअखेर उर्वरित पान ४ जमिनीत ७ इंच ओलशिवाय पेरण्या कदापि करू नका ^ भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात पुढच्या चार दिवसात हलका व मध्यम पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस हा पेरण्यासाठी पुरेसा नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यासाठी घाई करू नये. जोपर्यंत जमिनीत ७ इंच ओल तयार होत नाही तोपर्यंत पेरण्या करू नये. रवी आंधळे, शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. गेल्या वर्षी परिस्थिती एकदम उलट होती. मे महिन्यात झालेल्या तब्बल २२० मिमी अवकाळी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली होती. त्यामुळे १ जूनपासूनच खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आणि २६ जूनअखेर सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र मान्सूनपूर्व तसेच मान्सूनच्या पावसाने हुलकावणी दिल्याने जमिनीत आवश्यक ओल तयार झाली नाही. परिणामी २७ जूनअखेर ३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होतील, हा कृषी विभागाचा अंदाजही फोल ठरला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *