Headlines

खिडक्या तुटल्या, फरशा उखडल्या, पत्रे‎गंजले…; तरीही आज "स्कूल चले हम’‎:जिल्ह्यातील 2084 पैकी 1212 शाळांच्या दुरुस्तीची मागणी ‎




आजपासुन शाळांना सुरुवात होत असून‎ग्रामीण भागातील चिमुकल्यांना बसायला‎सुरक्षित वर्गखोल्याच नाहीत. पावसाळ्यापूर्वी‎आपत्ती व्यवस्थापन आणि भौतिक सुविधांच्या‎नावाखाली प्रशासनाकडून केवळ वल्गना‎केल्या जात आहेत. जिल्ह्यातील २०८४ पैकी‎तब्बल १२१२ जिल्हा परिषद शाळा अक्षरशः‎मोडकळीस आल्याचे भयंकर वास्तव समोर‎आले आहे. गंजलेले पत्रे, फुटलेल्या फरशा,‎गळके छत, गायब स्वच्छतागृहे. या दयनीय ‎‎अवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी ‎‎दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो. ‎‎तरीही शाळांची दुरवस्था कायम आहे.‎ शहरालगत असलेल्या पळशी येथील जि.प. ‎‎शाळेत १९७० मधील ८ वर्गखोल्या आहेत.‎त्यांचे पत्रे आणि अँगल पूर्णपणे तुटले आहेत.‎ऐन पावसाळ्यात ३१० विद्यार्थ्यांच्या अंगावर‎छत कोसळण्याची भीती प्रभारी मुख्याध्यापक ‎‎पंकज मंडगे यांनी व्यक्त केली.‎चौक्याजवळील शाळेत स्वच्छतागृहांची‎अवस्था नरकासमान आहे. रायगवानच्या‎शाळेला साधी सुरक्षा भिंतही नाही. लामकाना ‎‎तांड्यावरील संतापलेले नागरिक म्हणतात, ‎‎अधिकारी फक्त येतात. पाहून जातात. अनेक ‎‎शाळांमध्ये दोन ते तीन वर्गांतील विद्यार्थी एकाच ‎‎वर्गात बसवतात.‎ ३.४६ कोटींचा प्रस्ताव कागदावरच‎ अतिवृष्टीमुळे कन्नड (२५), गंगापूर (३६), सिल्लोड (३९),‎वैजापूर (१२) आणि फुलंब्री (६) अशा एकूण ११८ शाळांचे‎नुकसान झाले. या शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाने‎तब्बल ३ कोटी ४६ लाखांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दिला होता.‎ मात्र, अद्याप या शाळांची अवस्था ”जैसे थे”चआहे.‎ दुरुस्तीची कामे सुरू आहेत‎ शाळा दुरुस्तीची कामे सुरु आहेत.‎ काही ठिकाणी अद्यापही कामे बाकी‎ आहे. शिक्षण विभागाकडून‎ अहवाल मागितला असून स्वतः‎ यावर लक्ष ठेवून आहे.‎ मुख्यध्यापकांना देखील काही‎ अडचणी असल्यास त्यांनी थेट ‎येऊन सांगितले तरी चालेल.‎ – पी. एम. मिन्नू, मुख्य कार्यकारी‎अधिकारी‎ शाळांचे ”स्ट्रक्चरल‎ऑडिट” तातडीने करा‎ नवीन सीईओ विद्यार्थ्यांसाठी काम‎करत आहेत, पण आता संपूर्ण‎ जिल्हाभरातील शाळांचे तातडीने‎”स्ट्रक्चरल ऑडिट” करण्याची वेळ‎ आली आहे. जि.प. शाळेतील मुले‎ हुशार आहेत, त्यांना केवळ भौतिक‎सुविधांची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या ‎जिवाशी खेळू नयेत. तत्काळ उपाय‎ करावेत. – विजय साळकर,‎जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती.‎ वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला : शिक्षणाधिकारी‎ मोडकळीस आलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना‎विचारले असता, त्यांनी केवळ ”शाळांची तपासणी करून‎वरिष्ठ स्तरावर सीईओंना अहवाल दिला आहे”, असे उत्तर‎ दिले. ”डीपीडीसी” आणि ”सीएसआर”मधून निधी आणून‎दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी‎ जयश्री चव्हाण यांनी सांगितले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *