Headlines

गवळीशिवरा येथे वीज तारा लोंबकळल्या, जीव धोक्यात:विजेच्या तारांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी‎




गवळीशिवरा (ता. गंगापूर) येथील गाजर मळ्यातील शेतवस्तीवर राहणारे शेतकरी राजेंद्र गवळी यांच्या गट नंबर २१ मधील शेतातील विद्युत खांबावरील लोंबकळत असलेल्या विजेच्या तारेमुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर धोका निर्माण झाला आहे. सध्या शेतीशिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. अशावेळी डोक्यावरून जाणाऱ्या विजेच्या तारा विद्युत खांबावर लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तत्काळ वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालावे. लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची दुरुस्ती करावी. शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनाही गाजर मळा परिसरातील लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्या रुबीनाबी समीर शेख, समीर शेख, अशोक शिरसे, अमोल गवळी, राजेंद्र गवळी, साहेबराव गवळी, गणेश मांडे, विलास म्हस्के, केदार केरे, संतोष चंद्रभान केरे, कार्तिक गवळी, भगवान फाळके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले आहे की सध्या शेतीशिवारात मशागतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी लवकरात लवकर तारांची दुरुस्ती करावी. अन्यथा महावितरणविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *