![]()
अंजनगाव बारी मे महिन्यातील वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीटमुळे अंजनगाव बारी परिसरातील केळी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. केळी उत्पादक शेतकरी निखिल श्रीकृष्ण भोपळे यांच्या दोन एकरांतील सुमारे १,८०० केळीची खोडे वादळात जमीनदोस्त झाली. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने पुढील हंगाम उभा करणे कठीण झाले आहे. प्रलंबित ठिबक अनुदान, पीककर्जाचा वाढता बोजा आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे हे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. केळी उत्पादक निखिल भोपळे म्हणाले, “वादळात आमच्या केळी बागेचे मोठे नुकसान झाले. पंचनामे होऊन दोन महिने झाले, तरी अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. कर्जाचा ताण वाढत आहे. गारपीट व अतिवृष्टीमुळे कांदा व केळीचे असे नुकसान झाले होते. शासनाने मदत द्यावी अवकाळी पाऊस व गारपीटमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन महिने उलटले तरी नुकसानभरपाई मिळालेली नाही. शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करुन ती संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली पाहीजे. – रोशन न्यायखोरे, कांदा उत्पादक शेतकरी, अंजनगाव बारी
Source link
गारपीटग्रस्त कांदा, केळी उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत