Headlines

कारभाराचे धिंडवडे:मोहोळ मध्ये झेडपी मुलींच्या शाळेत अस्वच्छता, स्वच्छतागृहाचा अभाव, आहार निकृष्टतेचा ठपका




मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या अचानक केलेल्या पाहणीत मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा धक्कादायक कारभार चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील तपासणी केलेल्या ६ पैकी तब्बल ५ शाळांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. मुलींच्या शाळेत अस्वच्छता, प्रांगणातील साचलेले पाणी आणि विद्यार्थ्यांना दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार यावरून समितीने प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. निवृत्त न्यायाधीश यांच्या पथकाने दोन दिवस केलेल्या तपासणीत शाळेत कुठे स्वच्छतागृह नाही तर कुठे पुरेसे पाणी नसल्याचे समोर आल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दर्जात्मक शिक्षण व सुविधांचे प्रातिनिधिक वास्तव दर्शन झाले. संभाजी खंडपीठाकडे सुनावणीस असलेल्या जनहित याचिकेत (क्र. १/२०१८) दिलेल्या आदेशानुसार जिल्हास्तरीय तपासणी समिती गठित केलेली आहे. समितीचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी व सचिव कादर शेख हे काम पाहत आहेत. या समितीमध्ये बापूसाहेब जमादार यांच्यासह सदस्यांनी मोहोळ येथील ६ शाळांची पाहणी केली. जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधा, गुणवत्ता आणि शासकीय योजनांमधील गंभीर त्रुटींचे वास्तव समिती समोर आले. एका शाळेने मात्र उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल समितीकडून वाहवा मिळवली. या शाळेत ई-लर्निंग सुविधा आणि संगणक शिक्षण उत्तम सुरू आहे. अध्यापनाचा दर्जा, विद्यार्थ्यांची शिस्त आणि प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी केली जाते. १३५ पैकी १२० विद्यार्थी उपस्थित होते. याबद्दल समितीने मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे विशेष कौतुक व प्रशंसा केली. मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहांची सुविधा अपुरी. शाळेच्या प्रवेशद्वारा समोरच अतिक्रमण आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ पत्रव्यवहार करून कारवाईचे आदेश दिले. पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षक व प्रशासनाने समन्वयाने विशेष प्रयत्न करण्याची सूचना केली. शाळेमध्ये स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नाही. शाळेच्या संरक्षण भिंतीलगत नागरिकांनी अतिक्रमण करून दरवाजे काढल्याचे आढळले. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींना घटनास्थळी बोलावून अतिक्रमण त्वरित हटवण्याचे आदेश दिले. संबंधितांनी स्वखुशीने अतिक्रमण हटवण्याची तयारी दर्शविली. स्वच्छतागृहासाठी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध नाही. शाळेच्या भिंतींवर झाडेझुडपे वाढलेली आहेत. संगणक बंद अवस्थेत आढळून आले. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीबाबत अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचे दिसून आले. मुख्याध्यापकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याचे आदेश दिले. जि. प. मुलींची शाळा : अस्वच्छता नि खराब धान्य नष्ट करण्याचे आदेश शाळा परिसरात अस्वच्छता आणि पटांगणात पाणी साचले होते. विद्युत कनेक्शनचा अभाव असून स्वच्छतागृहाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची (माध्यान्ह भोजन) अंमलबजावणी नियमानुसार होत नसल्याने संबंधितांना कडक ताकीद देण्यात आली. भोजन दर्जा सुधारण्याच्या सूचना देऊन, खराब झालेले धान्य तातडीने नष्ट करण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड न करण्याचे स्पष्ट आदेश दिले. जि. प. शाळा क्रमांक ३: पाणीपुरवठा उपलब्ध नाही जि.प. शाळा क्रमांक १ व २ : स्वच्छतागृहच उपलब्ध नाही जि.प. उर्दू शाळा : स्वच्छतागृहांची सुविधा अपुरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *