Headlines

गोठ्याला आग; 4 शेळ्या, अन् गोऱ्ह्याचा झाला मृत्यू:रहिमाबादेत शेतकऱ्याच्या पत्राच्या शेडला आग‎




तालुक्यातील रहिमाबाद येथील गट न. ५३ मधील शेतकरी सांडू धोंडीबा पाडळे यांच्या पत्र्याचे शेडला बुधवारी (दि.२७) रात्री अचानक आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी सांडू पाडळे याच्या शेतात जनावरांच्या निवाऱ्यासाठी व शेतीतील साहित्य ठेवण्याकरिता २५ ते ३० पत्राचे शेड उभारण्यात आले आहे. बुधवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात कारणाने या शेडला आग लागली व या आगीत पूर्ण पत्राचे शेड जळून खाक झाले. यात चार शेळ्या, एक गोऱ्हा, गव्हाच्या भरलेल्या ११ ते १२ गोण्या , शेतीसाठी ठेवलेले ठिबक संच, त्या साठी लागणारे पी व्ही सी पाईप,शेती साठी लागणारे अवजारे व अन्य संसार उपयोगी साहित्य हे सर्व जळून खाक झाले. यात दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागली त्या वेळी शेतात कोणी नसल्यामुळे व सदरील शेड बंद असल्यामुळे जनावरे या मध्ये तडफडून दगावली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *