Headlines

चांदवड तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षेत चमकदार कामगिरी:मित डुंगरवालला 97.67 टक्के गुण; विविध शाखांतील विद्यार्थी प्रथम‎


.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेत येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री हिरालाल हस्तीमल (जैन ब्रदर्स, जळगाव) तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. सिव्हील इंजिनिअरिंग शाखेत तृतीय वर्षातील मित डुंगरवाल याने ९७.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

द्वितीय वर्षात माधवी वाघ हीने ८५.४४ टक्के, तर प्रथम वर्षात वैष्णवी खैरनार हीने ९३.४४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. कॉम्प्युटर टेक्नोलॉजी शाखेत तृतीय वर्षातील नेहा ललवाणी हीने ९६.१८ टक्के, द्वितीय वर्षातील नेहा पाटील हीने ९४.७० टक्के, तर प्रथम वर्षातील तन्वी पवार हीने ९१.८८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन शाखेत तृतीय वर्षातील नम्रता आहेर हीने ९६.०६ टक्के, द्वितीय वर्षातील दिव्या सोनवणे हीने ८९.७८ टक्के, तर प्रथम वर्षातील तनुजा देशमाने हीने ९०.५९ टक्के गुण मिळवत अव्वल स्थान मिळविले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेत तृतीय वर्षातील समर्थ जाधव याने ९५.६७ टक्के, द्वितीय वर्षातील साक्षी आथरे हीने ८९.१७ टक्के, तर प्रथम वर्षातील शिवम जाधव याने ९१.५९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

डिप्लोमा इंटेरिअर डिझाईन अँड डेकोरेशन शाखेत द्वितीय वर्षातील पूजा सोनवणे हीने ९०.२५ टक्के, तर प्रथम वर्षातील वंशिका जैन हीने ९३.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. डिप्लोमा ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग शाखेत द्वितीय वर्षातील सेजल निकम हीने ८९.३३ टक्के, तर प्रथम वर्षातील मेघा चव्हाण हीने ९०.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. विशाल वानखेडे, समन्वयक अरविंदकुमार भन्साळी व राजेंद्रकुमार बंब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *