![]()
राष्ट्र सेविका समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतीर्थ येथे शिवराज्याभिषेक दिन (हिंदू साम्राज्य दिन) साजरा करण्यात आला. यावेळी शिवतिर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास गंगाजल व दुग्धाभिषेक करून नंदकिशोर शेवाळे व हेडा दापत्याच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. परिमल जोशी यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीती, चारित्र्य व आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही देशाच्या राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेच्या पुनर्स्थापनेचा ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. देव, देश आणि धर्मरक्षणासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला. या भूखंडाचे ठायी, धर्मरक्षक ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे॥” या ओळींनी शिवरायांना अभिवादन करण्यात आले. तन्वी शेवाळे हिने सादर केलेल्या शिवगर्जनेने वातावरण शिवमय झाले. यावेळी डॉ. विद्या सोनवणे, राजश्री पंडित, हरिप्रिया जोशी, लावण्या सोनवणे, वृंदा दुबे, मणिकर्णिका दुबे, भारवी शिरोरे व शिवप्रेमींनी परिश्रम घेतले.
Source link
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची आरती व दुग्धाभिषेक:सटाण्यात शिवतीर्थावर शिवराज्याभिषेक दिनी विविध उपक्रम