![]()
शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांनी उभारलेल्या आंदोलनाची तसेच सर्वपक्षीय मोर्चाची राज्याच्या वरिष्ठ पोलीस यंत्रणेने गंभीर दखल घेतली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाच
.
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच काही तक्रारदारांशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांच्या अडचणी, तक्रारी आणि सूचना जाणून घेतल्या. शहरातील गुन्हेगारीची सद्यस्थिती आणि पोलिसांच्या कारवाईबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नगराध्यक्ष करण ससाणे, सुनील मुथा, प्रकाश चित्ते, सचिन गुजर, संजय फंड, गौतम उपाध्ये, वैशाली चव्हाण, रवी पाटील आदी उपस्थित होते. अनेकांनी गुन्हेगारीचे स्वरूप वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सविस्तर मांडले. अल्पवयीन मुलांचा वापर करून गंभीर गुन्हे घडवून आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अल्पवयीन आरोपींना कायदेशीर प्रक्रियेनंतर लवकर जामीन अथवा सुटका मिळत असल्याने त्यांचा पुन्हा गुन्हेगारीसाठी वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला चुकीची माहिती पुरविली जात असल्यामुळे गुन्हेगारांना संरक्षण मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. मुख्य आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.