Headlines

जनगणना देशाच्या विकासाचा पाया; गाफील राहू नका:देवळाली प्रवरा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन




प्रतिनिधी | राहुरी आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आणि विकासाचा पाया आहे,” असे प्रतिपादन मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी ऋषिकेश पाटील यांनी केले. शासकीय योजनांचा लाभ, निधीचे नियोजन आणि सामाजिक-आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर अवलंबून असते. यंदाची जनगणना ही डिजिटल स्वरूपाची असल्याने तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती संकलित करताना अत्यंत दक्ष राहावे, अशा सूचना पाटील यांनी दिल्या. प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी व शिक्षक सचिन निमसे यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी माहिती संकलनाच्या पद्धती, फॉर्म भरण्याचे नियम आणि प्रत्यक्ष कामातील संभाव्य अडचणी यावर सविस्तर सादरीकरण केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी दीपक जग्रवाल यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक वसुली विभाग प्रमुख रामदास म्हस्के यांनी केले, तर आभार संभाजी वाळके यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *