Headlines

नेवाशातील दोन ठिकाणी पोलिसांनी उद्ध्वस्त केला गोमांस विक्रीचा अड्डा:नाईकवाडी मोहल्ल्यातून १५५ किलो मांसासह ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त




प्रतिनिधी | नेवासे शहरातील नेवासा खुर्द भागात सुरू असलेल्या गोमांस विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी सकाळी धडक कारवाई करत खळबळ उडवून दिली. या छाप्यात पोलिसांनी दोन संशयितांना बेड्या ठोकल्या. सुमारे १५५ किलो मांस आणि विक्रीचे साहित्य असा एकूण ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांना नेवासा खुर्द येथील नाईकवाडी कुरेशी मोहल्ल्यात बेकायदेशीरपणे गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच कोणताही विलंब न लावता ढिकले यांनी तात्काळ विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. सकाळी ८. ३० च्या सुमारास पोलिसांनी पहिल्या ठिकाणी छापा टाकला असता अरबाज अबू चौधरी (२९, रा. नेवासा खुर्द) हा इसम मांस कापून विक्री करताना रंगेहाथ सापडला. ही कारवाई सुरू असतानाच, शेजारील एका घराच्या वरच्या मजल्यावरही असाच प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथेही धाड टाकत आवेज शेख याला ताब्यात घेतले. या छाप्यात १५५ किलो (किंमत ४६,५०० रुपये), इलेक्ट्रिक वजन काटे, सत्तूर व इतर साहित्य, असा एकूण ४८,००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अरबाज चौधरी आणि आवेज शेख या दोघाांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सागर ढिकले, हवालदार अजय साठे, श्रीनाथ गवळी, नारायण डमाळे, राम वैद्य, गणेश जाधव आणि सुमित करंजकर यांच्या पथकाने केली.पोलिस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *