Headlines

मोर्शीत महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक, कार्यालयात घुसले कार्यकर्ते:कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात दोन तास ठिय्या, पोलिसांचा मोठा बंदोबस्त




मोर्शीत महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात तालुका काँग्रेस कमिटीने कार्यकारी अभियंता कार्यालयावर आंदोलन केले. विपुल भडांगे आणि भूषण कोकाटे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. कार्यालयासमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन तास ठिय्या दिला. कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात प्रवेश केल्याने तणाव निर्माण झाला. शेतकऱ्यांना सोलर पंपाऐवजी डीडीएफ योजनेतून कनेक्शन, घरांवरील उच्च-लघुदाब वाहिन्या हलवणे, शेती पंपाचे कनेक्शन न कापणे, माफ केलेले बिल कमी करून नियमित वीज पुरवठा, स्मार्ट मीटरचे जास्त बिल कमी करणे, या मागण्या होत्या. आंदोलनात विपुल भडांगे, भूषण कोकाटे यांच्यासह नगरसेवक अल्पजा बडासे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष रमाताई इंगळे, इतर पदाधिकारी पुष्पाताई परतेती, माजी नगरसेविका सुनीताताई कुमरे, सेवादलाचे निलेश तट्टे, वासुदेव तायवाडे, गोलु शेख, मुरलीनाना डहाणे, संजय पांडव, संदीप भदाडे यांनी सहभाग घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *