![]()
मोर्शीजवळ मायवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. सोमलाल उईके (वय ५५) आणि त्यांची पत्नी चतुरबती उईके (वय ४८) अशी मृतांची नावे आहेत. मुलताई, बैतुल येथील गाजाढाबा गावाचे रहिवासी असलेले हे दाम्पत्य दापोरी येथील एका शेतात रखवालदारीचे काम करत होते. शुक्रवारी रात्री ते मोर्शी येथून काम आटोपून दापोरीला परत जात असताना त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक एमपी ४८ एन १५७१) ला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत चतुरबती उईके यांचा जागीच मृत्यू झाला, तर सोमलाल उईके यांचा उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. शनिवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मोर्शी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.
Source link
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य ठार:मोर्शीजवळ मायवाडी फाट्याजवळ घडली घटना, पोलीस सीसीटीव्ही तपासत आहेत