![]()
वरुड तालुक्यातील पुसला हे मोठे गाव असून, आजूबाजूच्या अनेक लहान गावांचे प्रवासी येथील बसस्थानकाचा वापर करतात. मात्र, येथे स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांची, विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येवर पुसला येथील युवा मित्र मंडळाने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी बसस्थानकावर स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांना उघड्यावरच शौचास जावे लागते, ज्यामुळे महिलांना जास्त त्रास होतो. जिल्हा परिषदेच्या निधीतून पुसला बस स्टॉपवर स्वच्छतागृह बांधावे, अशी विनंती निवेदनात केली आहे. यावेळी राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे अध्यक्ष प्रकाशदादा साबळे, युवा मित्र मंडळ पुसलाचे अध्यक्ष सुरज धर्मे, सहसचिव धीरज सावरकर, राहुल तायडे आणि अजिंक्य काळे उपस्थित होते.
Source link
पुसला बसस्थानकावर स्वच्छतागृहाअभावी महिला प्रवाशांची गैरसोय:युवा मित्र मंडळाने जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन