![]()
अमरावती: राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी कथित अपमानास्पद वक्तव्य केले. याचा भारतीय जनता पार्टीच्या अमरावती महानगर शाखेने निषेध केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आमदार देशमुख यांच्यावर कठोर कारवाईची मागणी भाजपने केली. त्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. समाज माध्यमात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, आमदार देशमुख बाळापूर येथील सरकारी कार्यालयात बावनकुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जीवनात पदाची प्रतिष्ठा आणि आदर राखणे आवश्यक आहे. बावनकुळे यांनी प्रशासन गतिमान करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे देशमुख यांचे वक्तव्य अयोग्य असल्याचे भाजपने म्हटले. या प्रकरणाची सत्यता तपासून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिला.
Source link
आमदार नितीन देशमुख यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा भाजपने केला निषेध:अमरावतीत आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी, व्हिडिओची चौकशीची मागणी