![]()
महासागरातील तापमानातील बदलानुसारपर्जन्यमानात मोठे बदल पहायला मिळतात.मागील दहा वर्षातील पर्जन्यमान पाहता,अहिल्यानगर जिल्ह्यात दर दोन ते चारवर्षांनी पर्जन्यमान कमी झाल्याचे दिसूनयेते. यापूर्वी २०२३ मध्ये कमी पाऊस झालाहोता. आता पुन्हा २०२६ मध्ये पॅसिफिकमहासागराचे तापमान ०.५ अंशापेक्षा अधिक वाढल्याने, एलनिनोचा प्रभाव निर्माण झाला. त्यामुळे अहिल्यानगरसह भारतातील मान्सूनचे ढग तिकडे ओढले जाऊन आठ ते दहाटक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात, समुद्रातील तापमान२९.८ अंश सेल्सिअस होते. पॅसिफिकमध्ये तापमान वाढून, कमी दाबनिर्माण झाला असल्याने, विषुवृत्तीयक्षेत्रातील हवेच्या प्रवाहाची दिशा बदलतआहे. परिणामी जे वारे भारतासहअहिल्यानगरकडे ओलावा घेऊनयायला हवे होते, ते पॅसिफिकच्यामहासागराकडे खेचले जात आहेत.त्यामुळे हिंद महासागरातील मान्सूनवाऱ्याची तागद व आर्द्रता कमी होऊनपर्जन्यमानावर परिणाम होऊन एलनिनोचेसंकट गडद झाले आहे. एलनिनोचा प्रभाव असला तरीशेतकऱ्यांनी पीक नियोजन कसे करावे,यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानेमार्गदर्शक अहवाल तयार केला आहे.एल निनो पॅसिफिक महासागरात उष्णतावाढवून हिंद महासागरातील मान्सूनवाऱ्यांची खेचण्याची ताकद कमी करतो,ज्यामुळे भारताचे मान्सून चक्रविस्कळीत होऊ शकते. जिल्ह्याचाविचार करता, मागील दहा वर्षांत २०१५मध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळीस्थिती निर्माण झाली होती. तसेच २०१८व २०२३ मध्येही तिव्र टंचाईचा सामनाकरावालागला. परंतू, दर दोन ते तीनवर्षानंतर पुन्हा दमदार पाऊस झाल्याचेआकडेवारीवरून स्पष्ट होते. पाऊस कमी पडेल, तुम्ही हे करा! पावसाचे आगमन उशिरा झाल्यास घाईने पेरणी करणे टाळावे,किमान ८०-१०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.जमीनीचे तापमान ४० ते ५० अंशावर आहे. या काळात पेरणीकेल्यास उगवन कमी होते. त्यामुळे जमिनीचे तापमान किमान १८ते २५ असायला हवे. जमिनीच्या खोलीनुसार पिकांची निवडकरा; हलक्या जमिनीत बाजरी, मटकी, हुलगा तर मध्यम ते खोलजमिनीत तूर, सूर्यफूल, रब्बी ज्वारी यांसारख्या पिकांचे नियोजनकरावे, असा सल्ला आपत्कालीन पीक व्यवस्थापनात दिला आहे. पाणी आणि ओलावा व्यवस्थापन पावसाचा खंड पडल्यास पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरी-वरंबे,बंदिस्त वाफे आणि मुलस्थानी जलसंधारणाचे उपाय अवलंबावेत.जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांच्या दोन ओळींतपाचट, काडीकचरा यांसारख्या अवशेषांचे आच्छादन वापरावे,ज्यामुळे २५ ते ३० मि.मी. ओलाव्याची बचत होते.
Source link
जागतिक महासागर दिन विशेष:महासागर खेचतोय मान्सूनचे ढग, पावसाची 8 टक्के तूट शक्य; 10 वर्षांत तिसऱ्यांदा कमी पाऊस