![]()
जिल्ह्यात एकूण २७ हजार ३७५ सौर कृषी पंप उभारण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. पैठण तालुक्यात आतापर्यंत ५ हजार ३८३ सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत. तर वैजापूरमध्ये ५ हजार ३७९, गंगापूरमध्ये ४ हजार ९८४, सिल्लोडमध्ये ४ हजार ८५१, कन्नडमध्य
.
सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सौरऊर्जा कृषी पंप व्यवस्था केल्याने उन्हाळ्यात विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना दिलासादायक ठरत आहे. महावितरणच्या पुढाकारातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सौर पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज उपलब्ध होत असून, रात्रीच्या अंधारात जीव धोक्यात घालून शेतीला पाणी देण्याची सौर कृषी पंपांमुळे ग्रामीण भागात ऊर्जेचा नवा अध्याय सुरू झाला असून, शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुरक्षित, सुलभ आणि स्थिर होत असल्याचे चित्र दिसत आहे. नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येणार असून, कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहील. शेतकऱ्यांनी ऑनलाइन प्रक्रिया केली तरी नंबर आला नाही, आला तरीही वेळेत सौरऊर्जा साहित्य उपलब्ध करून न देणे आदी समस्या असून खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होतेय. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी दीपक मोरे यांनी केली आहे. “प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत सौरऊर्जा पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी, सुरक्षित आणि अखंड सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. -पवनकुमार कछोट, महावितरणचे मुख्य अभियंता वेळ आता टळली आहे. वारंवार होणारे भारनियमन आणि रात्री सिंचनासाठी शेतात जावे लागणे अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते. साप-विंचू तसेच रानडुकरांच्या धोक्यामुळे अनेकदा जीवितासही धोका निर्माण होत असे. विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने उत्पादनावरही परिणाम होत होता. मात्र, सौर कृषी पंपामुळे या समस्यांवर प्रभावी तोडगा निघाला आहे. सूर्यप्रकाशावर चालणाऱ्या या पंपांमुळे सकाळी आठ ते सायंकाळी ५ या वेळेत शेतकरी सुरक्षित पद्धतीने सिंचन करू शकत आहेत.
सौरऊर्जा पोहोचवण्याचे ध्येय
कंपन्यांकडून आर्थिक लूट