![]()
पैठण शहरासह जायकवाडी, कातपूर, कारखाना परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सायंकाळी अचानक ढग दाटून आले. काही वेळातच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ तसेच जायकवाडी धरण परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे काही ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे सुरू आहेत. ढोरकीन | ढोरकीनसह अनेक गावांत शुक्रवारी (२२ मे) रात्री आठ वाजेदरम्यान जवळपास अर्धा तास ढगांच्या गडगडाटात अन् विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणची बाजरी, काढणीस आलेली पिके ओलीचिंब भिजली. शेतकऱ्यांची धांदल उडाली.
Source link
पैठण अन् जायकवाडी येथे अर्धा तास अवकाळी पाऊस:कांदा, बाजरी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल