Headlines

अखेर अमरावती कृऊबासवर प्रशासक:स्वाती गुडधे यांनी सूत्रे स्वीकारली, दिव्य मराठीने एक दिवस आधीच दिले होते वृत्त




अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर (कृऊबास) प्रशासक नेमण्यात आला आहे. मोर्शीच्या सहायक निबंधक तथा प्रभारी उपनिबंधक स्वाती गुडधे यांनी सोमवारी सकाळी प्रशासक म्हणून सूत्रे स्वीकारली. दिव्य मराठीने रविवारच्या अंकात याबाबत वृत्त दिले होते. या संस्थेची उलाढाल सुमारे १,५०० कोटी रुपयांहून अधिक असून, वार्षिक उत्पन्न १८ कोटी रुपये आहे. संचालक मंडळावर इलेक्ट्रीफिकेशनच्या कामात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी संचालकांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. संचालकांनी या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने संचालकांची याचिका फेटाळली. तरीही नोटीसला उत्तर देण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, उत्तर देण्यापूर्वीच सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती केली. एका विधीतज्ज्ञांच्या मते, नोटीसला उत्तर देण्याचा कालावधी संपल्याने ही नियुक्ती कायदेशीर आहे. कृऊबासचे सभापती हरिश मोरे यांनी याला ‘दंडेलशाही’ म्हटले असून, पुन्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *