Headlines

तळेगाव एमआयडीसी हादरली:8 व्या मजल्यावरून पडून 34 वर्षीय विवाहितेचा अंत, तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू




पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव एमआयडीसी परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून पडून 34 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे हृदयद्रावक दृश्य काही नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा मनीष शंकर (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘काकडे व्हीटीपी अर्बन लाइफ’ सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. प्रतिभा या आठव्या मजल्यावरून खाली पडल्या, उंचावरून पडल्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तपासाचे चक्र सुरू; आत्महत्येची की अपघाताची शंका? प्रतिभा शंकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप गूढ कायम आहे. त्यांनी घरगुती वादातून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली की हा एखादा अपघाती प्रकार आहे, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिस कार्यवाही तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी सध्या ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद केली आहे. पोलिस सूत्रानुसार, घटनेच्या वेळी नेमकं काय घडलं हे शोधण्यासाठी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. तसेच, संबंधित कुटुंबीय, शेजारी आणि सोसायटीतील प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सोसायटी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस तपासाचा अहवाल समोर आल्यानंतरच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *