Headlines

दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने मदत:स्मृती सेवाश्रम आणि प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम




स्मृती सेवाश्रम, नया अकोला आणि प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट, वलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिकची रिसॉर्ट, वलगाव येथे दिव्यांग बांधवांना आधार व स्वावलंबनाची दिशा देणारा कार्यक्रम नुकताच पार पडला. या उपक्रमांतर्गत अत्यंत गरजू दिव्यांग बांधवांना झेरॉक्स मशीन, पीठ गिरणी व मिरची कांडप केंद्र यांसारखे रोजगाराभिमुख साहित्य वितरित करुन मदतीचा हात देण्यात आला. याचवेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार रवी राणा यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. समाजातील अत्यंत दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्रसिध्द चित्रकार विजय राऊत, जिजाऊ बँकेचे माजी अध्यक्ष अविनाश कोठाळे, श्री संत अच्युत महाराज रुग्णालय ट्रस्ट, अमरावतीचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर, संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप काळे, धन्वंतरी सहकारी रुग्णालय अमरावतीचे उपाध्यक्ष गजानन रडके, होमिओ डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. गुणवंत डहाणे, युवा उद्योजक नितीन भटकर, अनिस भाई, प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक सचिन मालकर, गौरव इंगळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. दिलीप काळे यांनी स्मृती सेवाश्रम, नया अकोला आणि प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट, वलगाव यांनी गेल्या सात वर्षांपासून संयुक्तपणे राबवलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा आढावा घेतला. माजी जिल्हा दिव्यांग बांधवांना सक्षम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रकाश साबळे यांचा हा समाजपयोगी उपक्रम स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे. केवळ मदत न करता दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत असून अशा कार्याला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन हेमंत काळमेघ यांनी केले. ‘सेवा परमो धर्म’ या उक्तीप्रमाणे गरजू रुग्णांना सक्षम व पारदर्शक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटल महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून समाजातील प्रत्येक घटकाने या आरोग्य मंदिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अनिल सावरकर यांनी केले. अविनाश कोठाळे व विजय राऊत यांनी आपल्या मनोगतातून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी दिव्यांग बांधवांसाठी उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. संजय काळे, उपसरपंच तथा अपंग संघटनेचे अध्यक्ष मयूर मेश्राम आणि गरजू दिव्यांगांना रोजगारासाठी दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणारे उद्योजक अशोक गावंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचे स्वागत अन्नुला खान, अमित कुचे, गणेश कडू, अक्षय सरोदे, सौरभ माहोरे, योगेश बोबडे, प्रवीण बोबडे, गजानन इसळ, सुधीर पडोळे, सचिन महल्ले, विजय वाकेकर आणि यश जवंजाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राहुल तायडे, विनोद जायलवाल, निलेश उभाड, प्रा. सुनील सावळे, सुनील भगत, उमेश वाकोडे, सुनील पडोळे, किशोर महल्ले आणि गोपाल महल्ले यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजातील सक्षम घटकांनी वंचितांच्या मदतीसाठी समोर यावे समाजातील दिव्यांग, पीडित, शोषित, अन्यायग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच दुर्धर आजारांनी ग्रस्त गरजू व्यक्तींसाठी समाजाने संवेदनशीलता दाखविण्याची गरज आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे समाजाचे ब्रीद बनले तर अनेक गरजूंचे जीवन सुसह्य होऊ शकते. समाजातील सक्षम घटकांनी वंचितांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन प्रकाश साबळे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *