Headlines

धाराशिव-बीड-संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी:डीपीआर प्रक्रिया सुरू, लोकसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती




अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या सुमारे २४० किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या बहुप्रतीक्षित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. सर्वेक्षणानंतर राज्य शासन, नीती आयोग व अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर पुढील टप्प्यांचा निर्णय घेतला जाईल. या रेल्वेमार्गामुळे मराठवाड्यातील ३ जिल्ह्यांतील संपर्क वेगवान होईल. संभाजीनगरमधील ऑरिक सिटी, शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रासह पर्यटन व मालवाहतुकीला मोठा फायदा होईल. संभाजीनगर थेट दक्षिण भारताला जोडणार प्रस्तावित रेल्वेमार्ग तीन जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प आहे. भविष्यात आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी तो महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या मार्गामध्ये उत्तर–दक्षिण रेल्वे कॉरिडॉरचा महत्त्वपूर्ण भाग बनण्याची क्षमता आहे. संभाजीनगरला दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि पुढे दक्षिण भारताशी अधिक थेट रेल्वे जोडणी उपलब्ध होण्यास मदत होईल. प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये मार्ग : धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर लांबी : सुमारे २४० किमी स्थिती : सर्वेक्षणास मंजुरी, डीपीआर सुरू लाभ : पर्यटन, औद्योगिक विकास



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *