Headlines

'धिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड':धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया; CM फडणवीस दिल्लीकडे रवाना




विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकार नरमले असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आता तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. प्रधान यांच्या राजीनाम्यावर माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘धिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड.’ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला वाटते की हा विद्यार्थ्यांचा आणि युवा शक्तीचा प्रचंड विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. परंतु, आता ज्या बातम्या येत आहेत की धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. पंतप्रधानांनी स्वीकारला आहे का? पर्यायी व्यवस्था काय केली आहे, याबद्दल अद्याप आपल्याला माहीत नाही. परंतु, हा लोकशाहीमधला प्रचंड मोठा विजय आहे आणि हा मोदी सरकारच्या काळातला पहिला जबाबदारी स्वीकारून दिलेला राजीनामा आहे. याला एका वाक्यात सांगायचे झाले तर धिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. विद्यार्थ्यांच्या समोर सरकारला झुकावे लागले पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हे सरकार फार काळ टिकणार नाही. मोदी सरकारचा मनमानी कारभार यापुढे जनता स्वीकारणार नाही, हे यातून सिद्ध झाले आहे. जो दबाव निर्माण झाला होता विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे त्यामुळे सरकारला भाग पाडले गेले आहे. हा निर्णय संसदेच्या अधिवेशनाच्या आधी झाला असता तर संसदेचे कामकाज सुरळीत पार पडले असते. कदाचित ठोस उपाययोजना करता आली असती. पण आत्तापर्यंत सरकारची कारकीर्द पाहता स्वतःची चूक कधी स्वीकारायची नाही आणि हट्टीपणाने सरकार चालवायचे हे 12 वर्षे आपण पाहिले. पण आता विद्यार्थ्यांच्या समोर सरकारला झुकावे लागले आहे. जबाबदारी आता कोणाकडे सोपवतात हे पहावे लागेल पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधान आता घाबरले आहेत, त्यांना रात्री 12 वाजता व्हिडिओ रिलीज करावा लागतो. मी विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे असे त्यांना दाखवावे लागले. आत्ता जे उपाययोजना करत आहेत, टास्क फोर्स नेमली, एसआयटी नेमली, सचिवांना बदलले, हे आधी का नाही केले? त्यामुळे आता त्यांना त्यांची चूक लक्षात आलेली आहे आणि विद्यार्थी आता शांत बसणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर राजीनामा घेतला गेला आहे. अर्थात ही जबाबदारी आता कोणाकडे सोपवतात हे पहावे लागेल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले आहेत. केंद्रात त्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. आता धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी फडणवीस यांना संधी मिळणार का? असा प्रश्न अनेकांच्या मान्यता उपस्थित होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *