Headlines

नवले पूल परिसरातील लॉजवर छापा:9 महिलांची सुटका; 2 जणांना अटक, पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई




पुण्यातील नवले पूल परिसरातील लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने आंबेगाव बुद्रुक येथील दोन लॉजवर कारवाई करत 9 पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लॉजमध्ये महिलांकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहक पाठवून या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर 20 जुलै रोजी दोन्ही लॉजवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी 9 महिलांची सुटका केली. तसेच राकेश पाटोळे आणि मंगेश बनसोडे (लॉज व्यवस्थापक) या दोघांना घटनास्थळावरून अटक केली. ही कारवाई 20 जुलैला साई किरण लॉज आंबेगाव बुद्रुक, कात्रज आंबेगाव रोड, बर्गर किंग नवले पुलाजवळ आंबेगाव या ठिकाणी करण्यात आली. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात आणखी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. पुण्यात 17 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या पुण्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून जुन्या वादाच्या रागातून एका 17 वर्षांच्या अल्पवयीन तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सात जणांच्या टोळीने गाठून या तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेश नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर पुणे पोलिसांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास करत तीन आरोपींना अटक केली. गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या या तिन्ही आरोपींना भरपावसात गाडीला बांधून थेट घटनास्थळी नेले आणि त्यांची धिंड काढली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *