Headlines

नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट:आरोपीला अत्याचार करताना 4-5 मुलांनी रोखले, पण आरोपीने दगड भिरकावून त्यांना पळवून लावले




नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करताना 4-5 छोट्या मुलांनी पाहिले होते. पण आरोपीने दगड भिरकावून त्यांना पळवून लावले होते, अशी नवी माहिती या प्रकरणी पुढे आली आहे. या माहितीमुळे या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापुरात नसरापूर परिसरात काही दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. एका 65 वर्षीय व्यक्तीने एका साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणी उपरोक्त माहिती उजेडात आली आहे. अत्याचार होताना छोट्या मुलांनी पाहिले यासंबंधीच्या माहितीनुसार, आरोपीने चिमुकलीवर एका गोठ्यात लैंगिक अत्याचार केला. यावेळी 5 ते 10 वर्ष वयोगटातील 4-5 मुलांनी त्याला चिमुकलीवर अत्याचार करताना पाहिले. त्यांनी त्याला रोखण्याचाही प्रयत्न केला. पण आरोपीने त्यांच्या दिशेने दगड भिरकावून त्यांना पळवून लावले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी मुलांवर दगड फेकून मारल्याचा पुरावा जप्त केला आहे. पोलिसांनी या मुलांची ई-साक्षही नोंदवली आहे. आरोपीने दगड फेकून मारल्यानंतर सदर मुलांनी तत्काळ चिमुकलीच्या घरी धाव घेत तिच्या आजीला घडलेला प्रकार सांगितला. पण आजीने ओरडू नका काका झोपलेत असे सांगून मुलांना घराबाहेर पाठवले. आजीने या मुलांचे ऐकून बाहेर जाऊन पाहिले असते तर कदाचित चिमुकलीवर अत्याचार झाला नसता, तिचा जीव वाचला असता अशी चर्चा आता या प्रकरणी रंगली आहे. आरोपीला 14 मेपर्यंत पोलिस कोठडी दुसरीकडे, न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला 14 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपीला आज पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने आरोपीला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? असा प्रश्न केला. त्यावर आरोपीने नाही असे उत्तर दिले. या प्रकरणी संक्षिप्त सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 14 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती राज्य सरकारने प्रस्तुत प्रकणात विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती केली. या प्रकरणाची सुनावणी प्रभावीपणे व जलदगतीने पार पाडण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. अजय मिसर यांनी आपल्या नियुक्तीनंतर या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेतला. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊनही ग्रामीण पोलिसांकडून प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. सरकारने या प्रकरणी विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठीही ठोस निर्णय घेतल्याची माहिती आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *