Headlines

‘ना सेंट्रली डायरेक्ट, ना रिमोट कंट्रोल’:राम मंदिर वादाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचे वक्तव्य




समाजात अनेक संघटना असून उपक्रम सुरू आहेत. या सर्व संघटनांचे संचालन संघच करतो, संघ त्यांना “सेंट्रली डायरेक्ट’ किंवा “रिमोटली कंट्रोल’ करतो, असा लोकांचा मोठा गैरसमज आहे. पण संघ कार्याच्या रचनेत असे अजिबात होत नाही, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. अयोध्येतील राम मंदिरात पैसे आणि दागदागिन्यांची चोरी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर सरसंघाचालकांचे हे वक्तव्य आले आहे. येथील सायंटिफिक सोसायटी सभागृहात शुक्रवार, ३ जुलै रोजी संघ कार्यात आयुष्य समर्पित करणाऱ्या प्रचारकांच्या जीवनप्रवासावर आधारित व्हिडिओ मालिकेच्या १०१ व्या भागाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अनुकूल काळातील जयजयकाराची चिंता संघाला सध्या मिळत असलेल्या लोकप्रियतेवर बोलताना त्यांनी स्वयंसेवकांना सजग राहण्याचा इशारा दिला. “आतापर्यंत जो जयजयकार होत नव्हता, तो आता अनुकूल काळात होत आहे. याची चिंता आपल्याला खूप करावी लागते. रूप बदलले तरी तत्त्व बदलता कामा नये,’ असे ते म्हणाले. कठीण काळात तत्त्व टिकवणे सोपे असते. मात्र अनुकूल काळात मूळ विचारांपासून भरकटण्याचा धोका असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *