Headlines

बहिरगाव येथे कृषी मार्गदर्शन शिबिर:कापूस क्रांतीसह हुमणी अळी नियंत्रणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन‎




हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून १ ते ७ जुलै दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कृषी सप्ताह साजरा केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहिरगाव ता. कन्नड येथे कृषी मार्गदर्शन शिबिर उत्साहात झाले. या शिबिरात तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी शेतकऱ्यांना कापूस क्रांती योजनेअंतर्गत सघन व अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञान, हुमणी अळीचे प्रभावी नियंत्रण, महाविस्तार ॲपची उपयुक्तता, तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांचा संतुलित व शास्त्रीय वापर याविषयी सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर, कन्नड पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास अधापुरे यांनी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ या खत विक्री प्रणालीची तांत्रिक माहिती देत कृषी विभागाच्या विविध योजनांची सांगोपांग माहिती दिली. या प्रसंगी बहिरगावचे सरपंच डॉ. केशव शिरसे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कौतिक पवार, मंडळ कृषी अधिकारी मनोज पोतदार, सहायक कृषी अधिकारी अनिल गुरव, मंगेश राठोड आणि कृषी विस्तार अधिकारी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौतिकराव दापके, नामदेव दापके, किशोर सोनवणे, किशोर नरोडे, रावसाहेब दापके, रामकृष्ण दापके शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी विकास चौंधे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी योगेश घाडबळे यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *