![]()
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन योजनेकडे वळत असून माळरानावरती बागायतीसह फळबागायती बरोबरच इतर शेती पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल पहावयास मिळत आहे. विविध शासनाच्या अनुदानित योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र ठिबक सिंचन योजनेकडे यावर्षी ल
.
जिल्ह्यातील शेतकरी कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी ठिबक सिंचनाचा पर्याय स्वीकारत आहेत. शासनाच्या विविध योजनांमधून अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के, तर महाभूधारक शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सन २०२५-२६ मध्ये तालुका कृषी विभागाकडे ठिबक सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव प्राप्त झाले होते. शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने ठिबक सिंचन मागणी सोडत करण्यात आली होती. त्यापैकी ३९६३७ शेतकऱ्यांनी मागणी केली होती. त्यापैकी ३७४५ शेतकऱ्यांना ११२६.८२ निधी वाटप करण्यात आला . उर्वरित शेतकरी पूर्वसंमतीसह निधीच्या प्रतीक्षेत आहेत.
^शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. पूर्वसंमती मिळाली होती. त्यापैकी काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी मागणी करण्यात आली आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होईल, तसे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येईल. हर्षद निगडे, (तालुका कृषी अधिकारी)
^शासनाने पूर्वसंमती दिली होती. त्यामुळे शासनाच्या अनुदानातून मिळेल, या हेतूने ठिबक सिंचन केले होते. मात्र अद्याप आम्हाला योजनेचा लाभ मिळाला नाही. शासनाने लवकरात लवकर योजनेचा लाभ द्यावा. महेश गुरव, (शेतकरी)
उ. सोलापूर- ४०७ द.सोलापूर – ११५ बार्शी – ७८४ अक्कलकोट- ४७ मोहोळ- १८४ माढा- ४३९ करमाळा- ४७१ पंढरपूर- ३४४ सांगोला- ४३१ माळशिरस- १९२ मंगळवेढा- ३३१ एकूण- ३७४५
आकडेवारीवर नजर टाकल्यास बार्शीमध्ये ७८४, करमाळ्यात ४७१ आणि माढ्यात ४३९ शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला आहे. हा आकडा मोठा वाटत असला, तरी या तालुक्यांमधून आलेले अर्ज आणि प्रलंबित राहिलेली संख्या याच्या तुलनेत हा लाभ म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ अशीच परिस्थिती आहे. पूर्वसंमतीच्या पत्रावर विश्वास ठेवून स्वतःला सिंचन व्यवस्थेत अडकवून घेतलेला सोलापूरचा शेतकरी आता कृषी अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारून हताश झाला.