Headlines

'नीट'सारख्या गंभीर विषयावर राजकारण नको:संसदेतील गोंधळावर खासदार नरेश म्हस्के यांचा विरोधकांवर हल्लाबोल




संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ‘नीट’ परीक्षेसारख्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर विषयावर राजकारण करण्याऐवजी संसदेत विधायक चर्चा व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. विरोधक सातत्याने गोंधळ घालून संसदेचे कामकाज ठप्प करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू दिले नाही, असे सांगत म्हस्के म्हणाले की, सरकार सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, चर्चा होऊ न देता कामकाजात अडथळे निर्माण करण्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे. ‘नीट’सारख्या विषयावर विधायक चर्चा व्हावी नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत सखोल चर्चा होणे आवश्यक असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विषयावर राजकीय संघर्ष उभा करण्यापेक्षा त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या मते, संसद हे देशातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. त्यामुळे अशा विषयांवर गोंधळाऐवजी विधायक चर्चा होणे अपेक्षित आहे. राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आंदोलनावरही नरेश म्हस्के यांनी आक्षेप घेतला. अशा प्रकारचे आंदोलन हे देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा तसेच संसदीय परंपरांचा अवमान असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन राहुल गांधी यांच्या भूमिकेविरोधात निदर्शने केल्याची माहितीही त्यांनी दिली. जनतेच्या प्रश्नांसाठी संसद, गोंधळासाठी नाही नरेश म्हस्के यांनी एक्स (X) वर केलेल्या पोस्टमध्येही विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही विरोधकांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू दिले नाही. देशातील जनतेने लोकप्रतिनिधींना संसदेत पाठवले आहे ते त्यांच्या समस्या मांडण्यासाठी, विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि देशहिताचे निर्णय घेण्यासाठी, असे त्यांनी नमूद केले. मात्र, हे सर्व बाजूला ठेवून विरोधकांकडून सातत्याने संसदेचे कामकाज ठप्प करण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही संस्थेचा वेळ आणि जनतेचा पैसा वाया घालवण्यापेक्षा विधायक चर्चा, सकारात्मक संवाद आणि लोकहिताचे निर्णय यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन नरेश म्हस्के यांनी केले. हेही वाचा… NEET परीक्षा रद्द करा, शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा!:महाराष्ट्र बंदनंतर प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी, तर दुसरीकडे केंद्राचा नवा कायदा
‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी, गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता थेट ‘नीट’ परीक्षाच रद्द करण्याची सर्वात मोठी मागणी केली आहे. दुसरीकडे, वाढत्या जनक्षोभाची दखल घेत केंद्र सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी आणखी कठोर कायदा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी एखाद्याने आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते!:नीट पेपरफुटीवरून मंत्री चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य, मनसेची टीका- 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू आंबा चोरल्यासारखं वाटतोय? ‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकारण तापले आहे. यातच आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (24 जुलै) एका पत्रकार परिषदेत बोलताना केलेल्या एका अजब वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “एखाद्याने आंबा चोरला, म्हणून त्याची शिक्षा फाशी असू शकत नाही,” असा युक्तिवाद त्यांनी पेपरफुटी प्रकरणावर बोलताना केला. या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *