Headlines

परमेश्वराला साधेपणा, निष्कलंकपणा‎असलेला भक्त प्रिय- किशोर महाराज‎:एरंडोल येथील पायी दिंडीला 32 वर्षे पूर्ण, कन्नड येथे वारकऱ्यांचा मुक्काम ‎




अलीकडच्या काळात समाजात दिखाऊ आणि भपकेबाज भक्तीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, अशा बाजारू स्वरूपाच्या भक्तीने परमेश्वर प्रसन्न होत नाही. देवाला निव्वळ साधेपणा, निष्कलंकपणा आणि मनातील खरेपणा असलेला भक्तच प्रिय असतो, असे प्रतिपादन कीर्तनकार किशोर महाराज कासोदेकर यांनी केले. श्री राजे गोविंद आश्रम व गोसेवा संस्थान, एरंडोल (जळगाव) येथील पायी दिंडीला यंदा ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रीत्यर्थ कन्नड येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. निरूपणासाठी किशोर महाराज कासोदेकर यांनी ‘संपदा सोहळा ना आवडे देवा’ हा अभंग घेतला होता. या वेळी कीर्तनातून आजच्या परिस्थितीवर रोखठोक भाष्य करताना ते म्हणाले, “आजकाल भक्ती आणि कीर्तनाचे मार्केट सुरू झाले आहे. पण देवाला असल्या बाह्य श्रीमंतीचा किंवा भपक्याचा सोहळा कधीच आवडत नाही. संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, संत सावता माळी अशा अत्यंत साध्या आणि सरळ भक्तांच्या हाकेला धावून येतो. म्हणूनच एकचित्ताने आणि खऱ्या भावनेने केलेले नामसंकीर्तन थेट ईश्वरापर्यंत पोहोचते. साधे सरळ नामस्मरणही देवाला भावते. या कीर्तन सोहळ्याला उत्तमराव गिरी, रामराव घुले, बाळासाहेब थोरात, अशोक महाराज मुंडवाडीकर, वाकडे महाराज कळंकीकर यांच्यासह शांतीनगर लिंगेश्वर महाराज भजनी मंडळाने उत्कृष्ट साथसंगत केली. यावेळी गोकुळ राठोड, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुरेश डोळस, संदीप महाजन, विजय शिरसाठ, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन विनोद पवार, राजू शेख कमिटी, राजेंद्र नेवगे, संतोष राजे जाधव, डॉ. सदाशिव पाटील, बाळू दाभाडे, रिजवान शेख, आकाश बोलधने, अश्विनी बोलधने, कस्तुरा राठोड, सुमन जाधव, शिवनंद गिरी, अनिता कवडे, जयश्री कवडे, ताराबाई जाधव, छबुबाई पवार यांच्यासह परिसरातील वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी उभारणार निवारा गृह या दिंडीचे कन्नड शहरात आगमन झाल्यानंतर कन्नड नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा फरीन बेगम व नगरसेवक अब्दुल जावेद यांनी पुष्पहार अर्पण करून वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी बोलताना नगरसेवक अब्दुल जावेद म्हणाले, “खानदेशातून पंढरपूरकडे निघणारी ही अखंड पायी दिंडी दरवर्षी कन्नड येथे मुक्काम करते. अशा पवित्र वारकऱ्यांचे दर्शन घडल्याने आमचीही एक प्रकारे वारीच घडली आहे. भविष्यात नगर परिषदेच्या वतीने वारकऱ्यांच्या सोयीसाठी शहरात एक सुसज्ज निवारा गृह उभारण्यात येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *