Headlines

वसपांगरा येथे विवाहितेचा खून केल्याची तक्रार:पतीविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, संशयीत पती ताब्यात




कळनुरी तालु्क्यातील वसपांगरा येथे विवाहितेचा खून करून मृतदेह विहीरीत फेकल्याच्या आरोपावरून पतीवर शुक्रवारी ता. ३ कळमनुरी पोलिस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयीतास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील लासीना येथील आबासा देवकर यांची बहिण शितल यांचा विवाह वाशीम जिल्हयातील झुनका बोराळा येथील रामू सोळंके याच्या सोबत झाला होता. विवाहानंतर त्यांना एक मुल देखील झाले होते. मागील काही वर्षापासून रामू व त्याचे कुटुंबिय वसपांगरा शिवारात राहण्यासाठी आले होते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून रामू सोळंके याचा त्याची पत्नी शितल यांच्यासोबत वाद होत होता. या वादातून रामू याने ता. २९ जून रोजी शितल यांचा खून करून सेलसुरा येथील विहीरीत फेकून दिला. त्यानंतर त्यानेच पत्नी बेपत्ता झाल्याचे सांगितले. त्यावरून शितल यांच्या माहेरच्या मंडळी सोबत रामू देखील त्यांचा शोध घेत होता. त्यानंतर गुरुवारी ता. २ सायंकाळी साडेसहा वाजता शितल यांचा मृतदेह विहीरीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जमीर नाईक, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, पुणे, जमादार एस. पी. सांगळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत शितल यांच्यावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला. या प्रकरणात मयत शितल यांचा भाऊ आबासा देवकर यांनी शुक्रवारी सायंकाळी कळमनुरी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. यामध्ये रामू सोळंके याने शितल यांचा खून करून विहिरीत फेकल्याचे नमुद केले. यावरून पोलिसांनी रामू याच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, उपाधिक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी कळमनुरी पोलिस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक पुणे पुढील तपास करीत आहेत. हे ही वाचा… हिंगोलीत टीनपत्रे काढून दुकान फोडले:चोरट्याने 2.40 लाख रुपये पळविले, सीसीटीव्हीमध्ये कैद; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल हिंगोली शहरातील बांगरनगर भागात टीनपत्रे काढून दुकानात शिरलेल्या चोरटयाने गल्लयातील २.४० लाख रुपये पळविल्याची घटना शुक्रवारी ता. ३ पहाटे घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. सविस्तर वाचा… औंढा नागनाथ मंदिर परिसरात ‘FDA’चा मोठा छापा:उघड्यावरील 1 क्विंटल पेढा जप्त करून केला नष्ट देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथे येथे मंदिराच्या परिसरात उघड्यावर पेढा विक्री करणाऱ्या 7 दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकून तब्बल 1 क्विंटल पेढा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे औंढ्यात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *