![]()
राज्यातील विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आघाडी घेत नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी आपल्या तीन उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामुळे उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार, दोन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे आदिती पोहोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, काँग्रेसने सर्वांत आधी आपल्या उमेदवारांची घोषणा करून या शर्यतीत आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या या घोषणेनंतर आता इतर प्रमुख राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची नावे कधी जाहीर करणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक अधिसूचना जारी: 29 सप्टेंबर 2026 उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 6 ऑक्टोबर 2026 अर्जांची छाननी: 7 ऑक्टोबर 2026 अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 9 ऑक्टोबर 2026 मतदानाची तारीख व वेळ: 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4) मतमोजणी व निकाल: 27 ऑक्टोबर 2026
Source link
काँग्रेसकडून 3 उमेदवारांची यादी जाहीर:नागपूर पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा