![]()
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधन विहीर (बोअरवेल) दुरुस्ती व देखभालबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात येणार आहे. यामुळे गावांमध्ये नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ ९० गावांतील विंधन विहिरी दुरुस्तीसाठी २८ लाख ८० हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. पाण्याची मागणीही वाढत आहे. उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. काही ठिकाणी २-३ कि.मी.पर्यंत पायपीट करून पाणी आणावे लागते. अनेक ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी विकत घ्यावे लागते. मजुरीसाठी फिरावे की पाण्यासाठी भटकंती करावी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडतो. काही वेळा ग्रामस्थांकडून संबंधित सरकारी यंत्रणांच्या कार्यालयांवर मोर्चेही काढण्यात येतात. दरम्यान, आता विंधन विहीर दुरुस्तीस मंजुरी दिली आहे.विंधन विहीर दुरुस्तीनंतर गावांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. विशेषतः उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल. विहिरींची नियमित दुरुस्ती झाल्याने पाण्याचादाब व गुणवत्ता सुधारेल. जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये पाणी टंचाईचा मुद्दा गाजतो. पाणी टंचाई असलेल्या गावांचा अनेकदा आराखड्यात समावेश नसतो. त्यामुळे सभांमध्ये पदाधिकारी, सदस्य अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्या गावांमध्ये उपाय योजना करण्याची मागणी करताना. पदाधिकारीही आदेश देतात. मात्र जि.प.चे अधिकारी वरिष्ठांनी घालून दिलेल्या निकषांच्या आधार घेत सदस्यांकडून सुचवण्यात येणाऱ्या उपाय योजना करण्यास असमर्थता दर्शवतात. तसेच गतवर्षी अपेक्षित पाऊस ६९३ मि.मी. असताना प्रत्यक्षात ७३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. यापूर्वी जादा पर्जन्यमान, वाढलेल्या भूजल पातळीचा दाखला देत काही ठिकाणी उपाय योजना नाकारण्यात आल्या होत्या. एकूणच जि.प.च्या निवडणुका झालेल्या नसल्याने सध्या प्रशासकीय राजवट असल्याने मान्यता मिळालेल्या उपाय योजनांची विहित मुदतीत व प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कोण पाठपुरावा करेल, असा प्रश्न आहे. अकोला बार्शीटाकळी मूर्तिजापूर पातूर अकोट तेल्हारा बाळापूर विविध कामे हाती घेतली जाणार पाणी टंचाई निवारणार्थ कामे हाती घेतली जाणार असून, त्यासाठी स्पष्ट अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. या योजनेत विंधन विहिरींची दुरुस्ती करताना पाइप बदलणे, पंप दुरुस्ती, बदल, गाळ काढणे (फ्लशिंग), पाण्याचा प्रवाह सुधारणा यासारखी कामे प्राधान्याने केली जातील. उपाययोजना गतिमान करण्याचे यंत्रणांसमोर आव्हान कृती आराखडाअसा ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. एप्रिल ते जून दरम्यान अडीचशे गावांसाठी २९९ उपाययोजनांचा समावेश आहे. टंचाई आराखड्यात जानेवारी ते मार्च, तसेच एप्रिल ते जून दरम्यान सर्व कामे मिळून २६२ गावांसाठी ३१४ विविध उपाययोजना व त्यासाठी ४ कोटी २७ लक्ष ४० हजार रुपयांच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.
Source link
पाणीटंचाई निवारणार्थ 90 गावांतील विंधन विहिरींची करणार विशेष दुरुस्ती:जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता; पाणीपुरवठा होणार अधिक सुरळीत